Papaya Rate : पपई हंगाम जोमात

खानदेशात यंदा पपईचा हंगाम जोमात आहे. रोज २४ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक होत आहे. दर जागेवर किंवा थेट खरेदीत ११ ते १२ रुपये प्रतिकिलो, असा मिळत आहे.
Papaya Rate | Papaya Season
Papaya Rate | Papaya Season Agrowon

जळगाव ः खानदेशात यंदा पपईचा हंगाम (Papaya Season) जोमात आहे. रोज २४ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक (Papaya Arrival) होत आहे. दर (Papaya Rate) जागेवर किंवा थेट खरेदीत ११ ते १२ रुपये प्रतिकिलो, असा मिळत आहे.

दरांचा तिढा मध्यंतरी नंदुरबारमध्ये सुरू होता. हा तिढा सुटला आणि पपई काढणीला वेग आला. नंदुरबारमध्ये सर्वाधिक आवक होत आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशातील खरेदीदार पपईची खरेदी करीत आहेत. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात रोज १० ते ११ ट्रक पपईची आवक होत आहे. यंदा पपईचे पीक सर्वत्र जोमात आहे.

Papaya Rate | Papaya Season
Papaya Subsidy : पपई लागवडीसाठी ४५ हजार रुपये अनुदान

उशिरा येणारे व तीन ते चार काढणीत आटोपणाऱ्या वाणांची शेतकऱ्यांनी लागवड केली होती. उशिरा येणाऱ्या वाणांमधूनही चांगली आवक होत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर या भागात आवक अधिक आहे. तर धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यांतही पपईची आवक होत आहे. सुरुवातीला प्रतिकिलो २१ रुपये जागेवरच दर मिळाला.

Papaya Rate | Papaya Season
Papaya Rate : अखेर पपईदराचा तिढा सुटला

नंतर दरात घसरण झाली. आवक अधिक असल्याचा मुद्दा खरेदीदार मागील २० ते २५ दिवसांपासून उपस्थित करीत होते. यामुळे दर कमी होत गेले. सध्या दर ११ ते १२ रुपये प्रतिकिलो, असे आहेत.

उत्तर भारतातून मोठी मागणी

थंडीचा कडाका वाढल्याने मागणीदेखील आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशातही पपईला मागणी आहे. या भागात खानदेशातील पपईची पाठवणूक केली जात आहे. पपईचे दर्जेदार पीक शहादा, तळोदा, शिरपूर, चोपडा, जामनेर भागात आहे. लांबट (कॅप्सूल) व अवीट गोडीची पपई काढणीवर आहे. यामुळे यंदा उठावही चांगला आहे. दर्जेदार पपईसाठी काही शेतकऱ्यांना १२ रुपयांवर दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com