Pomegranate Rate : नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढ; दरातही सुधारणा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात डाळिंबाची आवक ३,२५० क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते १४,००० तर सरासरी ९,००० रुपये दर मिळाला.
Pomegranate Of Market
Pomegranate Of MarketAgrowon

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात डाळिंबाची (Pomegranate) आवक ३,२५० क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते १४,००० तर सरासरी ९,००० रुपये दर मिळाला. यापूर्वीच्या सप्ताहात आवक १,८११ क्विंटल होती ५०० ते ११,००० तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला होता. त्यामुळे आवकेत वाढ होऊनही सरासरी दरात क्विंटलमागे १ हजार रुपयांची सुधारणा दिसून आली.

भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ५६२४ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल २,५०० ते ४,५०० असा तर सरासरी दर ३,३०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ४,००० तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक ६३ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,५०० ते ४,५०० रुपये तर सरासरी दर ३,५०० रुपये मिळाला. गाजराची आवक २,०३९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,००० ते ५,५०० तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला.

Pomegranate Of Market
Pomegranate Export : सततच्या नैसर्गिक आपत्तींचा डाळिंब निर्यातीत ‘खोडा’

उन्हाळ कांद्याची आवक ७,८३३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते ३,२०० तर सरासरी दर २,६०० रुपये राहिला. लसणाची आवक १२१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते १०,२०० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ४,४८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,५०० तर सरासरी दर २,००० रुपये राहिला. आद्रकची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,००० ते ८,७०० तर सरासरी दर ६,२०० रुपये राहिला.

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ५० ते ४०० तर सरासरी २५०, वांगी ६०० ते ९०० तर सरासरी ७५०, फ्लॉवर ७० ते ३०० सरासरी २०० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १२० ते २०० तर सरासरी १८० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३०० ते ७०० तर सरासरी दर ६०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २५० ते ४०० तर सरासरी ३२५, गिलके ३०० ते ४५० तर सरासरी २२५, दोडका ३०० ते ५०० तर सरासरी दर ४०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,१३८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,६०० तर सरासरी दर १,४०० रुपये मिळाला.

भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी किमान कमाल सरासरी

कोथिंबीर ४,००० १७,००० १२,०००

मेथी २,००० ४,००० ३,३००

शेपू २,५०० ६,००० ४,५००

कांदापात २,५०० ,५,८०० ४,०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com