Pomegranate : नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली;दर स्थिर

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात डाळिंबाची आवक ६,८९१ क्विंटल झाली.यामध्ये आवक झालेल्या मृदुला वाणास ५००० ते ११,००० तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला.
Pomegranate
PomegranateAgrowon

नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात डाळिंबाची आवक (Pomegranate Arrival ) ६,८९१ क्विंटल झाली.यामध्ये आवक झालेल्या मृदुला वाणास (Mrudula Pomegranate Verity) ५००० ते ११,००० तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला.यापूर्वीच्या सप्ताहात ही आवक ७,७८७ क्विंटल झाली. तुलनेत ८९६ आवक कमी झाली आहे; मात्र दर (Pomegranate Rate) स्थिर आहेत, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

Pomegranate
Pomegranate : डाळिंबाला पावसाचे ग्रहण

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ४,५७५ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४,००० ते ७,००० असा तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,५०० ते ४,००० तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला. गाजराची आवक १७२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,५०० तर सरासरी दर २,००० रुपये राहिला. वाटण्याची आवक १७४७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६,००० ते ७,००० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक ४१७ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,५०० रुपये तर सरासरी दर ३,८०० रुपये मिळाला.

उन्हाळ कांद्याची आवक २१,६०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २३० ते १,३२५ तर सरासरी दर ९५० रुपये राहिला. लसणाची आवक १७२ क्विंटल झाली. आवक कमी होऊन दर वाढले आहेत. त्यास प्रतिक्विंटल २,५० ते १०,००० तर सरासरी दर ७,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६९४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,१५० ते १,९५० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला. आद्रकची आवक ६६० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ६,५०० तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला.

Pomegranate
Pomegranate : ‘डॉलर अर्नर’कडे दुर्लक्ष नको

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ५० ते ४५१ तर सरासरी ३००, वांगी १५० ते ५०० तर सरासरी ३५०, फ्लॉवर १५० ते ५०० सरासरी ३५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १०० ते ३५० तर सरासरी २०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला २०० ते ५०० तर सरासरी दर ३८० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ८० ते २५५ तर सरासरी १७०,गिलके २५० ते ५०० तर सरासरी ३५०, दोडका ५०० ते ७०० तर सरासरी दर ६०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक २२३२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १,५०० तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला.

भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी किमान कमाल सरासरी

गावठी कोथिंबीर २,५०० ८,५०० ८,०००

कोथिंबीर हायब्रीड ३,००० ८,९१० ७,०००

मेथी २,००० ५,००० ४,०००

शेपू १,५०० ४,२०० ३,५००

कांदापात २,००० ५,५०० ४,०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com