Pomegranate Rate : डाळिंबाच्या दरात वाढ झाल्याने गोडी वाढली

सध्या उच्च दर्जाच्या डाळिंबाला प्रति किलोस १२० ते १५० रुपयांपर्यंत असा दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात डाळिंबाला प्रति किलोस १० ते १५ रुपयांनी दरात वाढ झाली असल्याने डाळिंबाची गोडी वाढली आहे.
pomegranate Market
pomegranate Market Agrowon

सांगली ः मृग बहरातील डाळिंबाची काढणी (Pomegranate Harvest) सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे १० ते १५ टक्के डाळिंबाची विक्री (Pomegranate Sale) झाली आहे. सध्या उच्च दर्जाच्या डाळिंबाला प्रति किलोस १२० ते १५० रुपयांपर्यंत असा दर (Pomegranate Rate) मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात डाळिंबाला प्रति किलोस १० ते १५ रुपयांनी दरात वाढ झाली असल्याने डाळिंबाची गोडी वाढली आहे.

pomegranate Market
Pomegranate Export : बांगलादेशकडून ‘एलसी’ मिळेना, डाळिंबाच्या निर्यातीत अडथळे

देशात यंदाच्या मृग बहारात डाळिंबाचा सुमारे ४० हजार हेक्टरवर बहर धरला आहे. हंगामाच्या प्रांरभी डाळिंबाला पोषक असे वातावरण होते. त्यामुळे डाळिंब बागा चांगल्या बहरतील अशी आशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या होत्या. परंतु अति उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम बागेवर झाला.

त्यामुळे डाळिंबाचे अपेक्षित सेटिंग झाले नाही. ऑगस्ट महिन्यात डाळिंब ५० ग्रॅम ते १०० ग्रॅम वजनाच्या आकाराचे झाले होते. त्यातच ऑगस्टच्या मध्यावर अतिपाऊस आणि सतत पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे काही प्रमाणात डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर परतीच्या पावसाने थैमान घातले. या साऱ्यामुळे डाळिंब उत्पादनात घट होणार अशी शक्यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.

pomegranate Market
Pomegranate Rate: सोलापुरात डाळिंबाला उठाव, दरही तेजीतच

दरम्यान, त्यातूनही शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा वाचवल्या. देशात मृग बहरातील डाळिंबाची ऑक्टोबर महिन्यापासून काढणी सुरू झाली आहे. हंगामाच्या प्रारंभापासूनच डाळिंबाचे दर प्रति किलोस १०० ते १५० रुपये असे दर मिळाला. आतापर्यंत देशात १० ते १५ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. बाजारपेठेत डाळिंबाची आवक कमी असल्याने मागणीही चांगली आहे.

त्यामुळे डाळिंबाचा अपेक्षित उठाव होत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून डाळिंबाला १२० ते १५० रुपये असा दर मिळत असून डाळिंबाचे दर टिकून आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात डाळिंबाला प्रति किलोस १० ते १५ रुपयांनी दरात वाढ झाली असल्याने यंदा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हंगाम गोड जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दर अधिक, पण खर्च जादा

वास्तविक पाहता, सातत्याने बदलत असलेल्या वातावरणाचा फटका डाळिंबाला बसला आहे. सध्या या साऱ्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात एकरी सुमारे २ ते ३ टनाने घट झाली असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. परंतु प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब बागा जगवण्यासाठी खर्चातही वाढ झाली आहे. डाळिंबाला दर चांगले मिळत असले तरी, डाळिंबाचा खर्च वाढला असल्याने आर्थिक गणित जुळणे मुश्कील बनले आहे.

देशातील यंदाचा डाळिंबाचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या डाळिंबाला चांगले दर आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्यातरी तर टिकून राहतील, असा अंदाज आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
एक नंबरच्या डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. त्याला अपेक्षित दर मिळत आहे. परंतु दोन नंबरच्या डाळिंबाला प्रति किलोस ६० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत असा दर मिळत आहे.
बाळासाहेब देशमुख, संचालक, अखिल महाराष्ट्र डाळिंब संघ, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com