पश्चिम बंगालमधील बटाट्याच्या दरात तेजी कायम

बटाट्याच्या ज्योती या साधारण वाणाचे ठोक बाजारातील दर सध्या २२ ते २४ रुपये प्रति किलो आहेत. गेल्या वर्षी याच काळात या वाणाला प्रति किलो १५ ते १७ रुपये असा दर होता.
पश्चिम बंगालमधील बटाट्याच्या दरात तेजी कायम
Potato Agrowon

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पश्चिम बंगालमधील बटाटा उत्पादनात (Potato Production) घट झाली आहे. त्यात इतर राज्यांमधून फारशी मागणी नसतानाही राज्यातील बटाट्याच्या दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. यावर्षी पश्चिम बंगालमधून इतर राज्यांत विक्री होणाऱ्या बटाट्याचे प्रमाण कमी असून संबंधित राज्यांनी उत्तर प्रदेशमधून बटाटा घेतला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

बटाट्याच्या ज्योती या साधारण वाणाचे ठोक बाजारातील दर सध्या २२ ते २४ रुपये प्रति किलो आहेत. गेल्या वर्षी याच काळात या वाणाला प्रति किलो १५ ते १७ रुपये असा दर होता. किरकोळ बाजारात ज्योती वाणाचा बटाटा २८ ते ३० रुपये प्रति किलो विकल्या जात आहे.

Potato
यंदा बटाट्याचे दर स्थिरावणार?

गेल्या वर्षी या वाणाला किरकोळ बाजारात १८ ते २० रुपये प्रति किलो दर होता. तर चंद्रमुखी वाणाचा बटाटा ४० ते ४२ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. गेल्यावर्षी चंद्रमुखीला २५ ते २८ रुपये किलो असा दर होता. वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांत पश्चिम बंगालची गणना होते. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये घेतले जाते. यावर्षी इथे उत्पादनात २० टक्क्यांची घट झाली आहे. यावेळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी राज्यात ८५ ते ९० लाख टन बटाट्याचे उत्पादन झाले आहे. २०२१ साली पश्चिम बंगालचे बटाटा उत्पादन १ कोटी १० लाख टन होते. २०२० साली राज्यातील बटाट्याचे उत्पादन ९५ लाख टन होते.

इतर राज्यांतील मागणी घटली असल्याने अद्याप राज्यातील कोल्ड स्टोरेजमधला बटाटा बाजारात दाखल झाला नसल्याचे वेस्ट बेंगाल कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे सदस्य पतित पाबन डे म्हणालेत. आसाम, बिहार, झारखंड आणि इतर राज्यांकडून पश्चिम बंगालमधील बटाट्यास प्राधान्य दिले जाते. यावर्षी ही बाजारपेठ उत्तर प्रदेशने काबीज केली आहे.

राज्यातील कोल्ड स्टोरेजमधील केवळ ७ टक्के बटाटा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात कोल्ड स्टोरेजमधील १० टक्के बटाटा बाजारात दाखल झाला होता.

यावर्षी उत्तर प्रदेश आणि इतर बटाटा उत्पादक राज्यांतील बटाटा उत्पादन वाढले आहे. लागवडीच्या काळात झालेल्या पावसामुळे अन त्यानंतरच्या प्रतिकूल हवामानामुळे पश्चिम बंगालमधील उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, आसनसोलसह इतर राज्यांतलया बाजारातही उत्तर प्रदेशमधील बटाटा विकल्या जात असल्याचे डे यांनी नमूद केले.

लागवडीचा काळात झालेल्या पावसाने काही ठिकाणी पिकाची खराबी केली. शेतकऱ्यांनी पुन्हा लागवड केली मात्र झालेले नुकसान भरून निघाले नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान राज्यात यावेळी पाऊस पडला. त्याचा फटका लागवडीस बसला. पावसापूर्वी हुगळी, मिदनापूर,बांकुरा आणि बरद्वान जिल्ह्यातील ६० टक्के लागवडीचे काम पूर्ण झाले होते, त्यामुळे तेथील पिकास फारसा फटका बसला नाही.

यावेळी पावसाने केवळ बटाटा उत्पादनावरच नव्हे तर हाती आलेल्या पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. कमी काळात येणाऱ्या बटाट्याच्या चंद्रमुखी वाणाचे अवेळी पावसाने नुकसान झाले. लोकांनी पुन्हा लागवड केली मात्र तरीही झालेले नुकसान भरून येऊ शकले नसल्याचेही डे यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com