Cotton Rate : कापूस दर सुधारण्याचा अंदाज

सूत आणि कापडाला उठाव नसल्याची ओरड आतापर्यंत होत होती. मात्र आता देशातील लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे देशातील अनेक महत्वाच्या बाजारांमध्ये सूत आणि कापसाला उठाव मिळत आहे.
Cotton
CottonAgrowon

पुणेः सूत आणि कापडाला उठाव नसल्याची ओरड आतापर्यंत होत होती. मात्र आता देशातील लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे देशातील अनेक महत्वाच्या बाजारांमध्ये सूत आणि कापसाला उठाव (Cotton Demand) मिळत आहे. पुढील काळात कापडाला आणखी मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापसालाही उठाव मिळून दरात (Cotton Rate) सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Cotton
Cotton Market : शेतकऱ्यांनीच फिरवला कापूस बाजार

देशातील कापूस बाजाराला आता लग्नसराईचा आधार मिळताना दिसत आहे. लग्नसराईमुळे कपड्यांना मागणी वाढत आहे. परिणामी सूत आणि कापसालाही उठाव मिळत असल्याचे चित्र देशातील काही बाजारांमध्ये दिसत आहे. मात्र अद्यापही देशातील कापूस उद्योगाला जास्त दरामुळे अडचण येत असल्याचे उद्योगाकडून सांगितले जात आहे. देशातील कापसाचे दर वाढले आहेत मात्र त्या प्रमाणात सुताचे दर वाढले नाहीत, असं सुतगिरण्यांचे म्हणणे आहे.

Cotton
Cotton Market : बाजारात कापसाची आवक कमी

लुधियाना मार्केटमध्ये सुताचे दर २६० ते २९५ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत. लुधियाना बाजारात मागील काही दिवसांपासून सुताचे दर जवळपास स्थिर असल्याचे येथील सूत व्यापाऱ्यांनी सांगितले. दिल्ली बाजारात मात्र जास्त दरामुळे मागणी कमी असल्याचे सांगितले. केवळ दिल्लीच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सूत जास्त उठाव कमी असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. दिल्ली येथील बाजारात सुताला २७५ ते ३३० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

Cotton
Cotton Boll Worm : तेलंगणामुळे बोंड अळीची भीती

हरियानात मात्र सुताला चांगला उठाव मिळत आहे. लग्नसराईमुळे येथील बाजारात कापड आणि सुताला मागणी वाढली. उद्योगाला कापूस दर कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र शेतकरी कमी दरात कापूस विक्री करण्यास इच्छूक नाहीत. वाढलेल्या दरात कापसाची गरजेप्रमाणं खरेदी होत असली तरी आवकही मर्यादीत आहे. त्यामुळे कापसाचे दर जास्त प्रमाणात तुटले नाहीत. परिणामी सूतगिरण्या गरजेप्रमाणे कापसाची खरेदी करत आहेत. तर कापड उद्योगाकडून सुताची मागणी सध्या मर्यादीत आहे, असे सूत व्यापाऱ्यांनी सांगितले.

रुईचे दर

उत्तर भारतातही कापसाचे दर जास्त आहेत. आवकही बऱ्यापैकी आहे. तसेच कापसाची खरेदीही सुरु आहे. त्यामुळे कापसाचा बाजारा टिकून आहे. उत्तर भारतात रुईला सध्या प्रतिक्विंटल १८ हजार ते १८ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. पंजाबमध्ये आज रुईचे व्यवहार १८ हजार ते १८ हजार ३०० रुपयाने पार पडले. तर हरियानातील दर १७ हजार ८०० ते १८ हजार २५० रुपयांवर होता. राजस्थानमध्ये रुईला १८ हजार ३०० ते १८ हजार ५७० रुपये दर मिळाला.

कापसाला आधार मिळणार

आत्तापर्यंत सूत आणि कापडाला उठाव नसल्याची ओरड संपूर्ण उद्योगाकडून होत होती. मात्र आता लग्नसराईमुळे कापड उद्योगाला आधार मिळतोय. चालू महिन्यापासून लग्नाचा हंगाम जोरात असतो. त्यामुळे पुढील काळात कापडाला मागणी वाढेल. परिणामी कापसाला चांगला उठाव येईल. या काळात कापसाचे दर पुन्हा सुधारण्याचा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com