Kabuli Chana Rate : काबुली हरभरा आणखी भाव खाणार

देशात सध्या काबुली हरभऱ्याचा साठा कमी आहे. त्यातच निर्यातीसाठी मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील काळातही काबुली हरभऱ्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Kabuli Chana
Kabuli ChanaAgrowon

पुणेः देशात सध्या काबुली हरभऱ्याचा साठा (Kabuli Chana Stock) कमी आहे. त्यातच निर्यातीसाठी (Chana Export) मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील काळातही काबुली हरभऱ्याच्या दरात (Kabuli Chana Rate) आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

देशातील बाजारात सध्या हरभरा दर दबावात आहेत. स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांना हरभरा दरात दिवाळीच्या काळात तेजी येईल, अशी आशा होती. मात्र नाफेडच्या विक्रीने सर्वांच्या आसेवर पाणी फेरलं. हरभरा दर सध्या दबावात असले तरी काबुली हरभऱ्याच्या दराने मोठी झेप घेतली आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारत काबुली हरभऱ्याला वाढलेली मागणी कायम आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत.

Kabuli Chana
Chana Cultivation : हरभरा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

देशात मागील हंगामात काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं होतं. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही काबुली हरभऱ्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सध्या दर तेजीत आहेत. चालू आठवड्यातही काबुली हरभऱ्याच्या दरातील तेजी कायम राहू शकते. निर्यातीसाठी मागणी कशी राहते, यावरही काबुली हरभऱ्याचे दर टिकून आहेत.

Kabuli Chana
Chana Cultivation : खामगाव तालुक्यात हरभरा लागवड वाढणार

अल्जेरिया या देशाकडून काबुली हरभऱ्याला मागणी आली. त्यामुळे सध्या काबुली हरभरा दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. परिणामी बाजारातील आवक कमी झाली. सुरुवातीला स्टाॅक केलेला काबुली हरभरा आता मोठ्या स्टाॅकिस्टच्या ताब्यात आहे. त्यामुळे या स्टाॅकिस्टना मोठ्या नफ्याची अपेक्षा आहे. परिणामी प्रक्रियादारांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.

सध्या देशातील बाजारात काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १३ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र पुढील माल हातात येईपर्यंत म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत काबुली हरभरा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. क्रिसमसच्या काळात काबुली हरभऱ्याला आणखी मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तर नोव्हेंबपासून आखाती देशांकडून मागणी येईल, असंही काही निर्यातदार सांगत आहेत. त्यामुळे पुढील काळात काबुली हरभरा आणखी भाव खाण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com