Sugar Market Rate : जागतिक बाजारात साखरेची विक्रमी दरवाढ सुरूच

Sugar Market Prices : जागतिक बाजारात साखर दरवाढीचा चौफेर उधळलेला वारू थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे.
Sugar Market
Sugar MarketAgrowon

Sugar Market Update :जागतिक बाजारात साखर दरवाढीचा (Sugar Rate) चौफेर उधळलेला वारू थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे. जागतिक बाजारात सातत्याने दरवाढ सुरू आहे. सोमवारी ( ता.८) लंडन शुगर बाजारात रिफाइन साखरेचा दर (Refine Sugar Rate) ७१५ डॉलर (६० हजार रुपये प्रति टन) वर पोहोचला. तर कच्चा साखरेचा दर प्रति टन ४८,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला.

भारतीय पांढऱ्या साखरेला टनास ५० हजार रुपयांपर्यंत दराने मागणी आहे. सध्या भारतातून साखर निर्यात होत नसल्याने मागणी असूनही भारतीय कारखानदारांना साखर पाठवता येत नसल्याचे चित्र उद्विग्न करणारे आहे.

जागतिक बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड वेगाने साखरेचे दर वाढत आहेत. भारत आणि अन्य युरोपियन देशांमध्ये साखरेच्या निर्मितीत घट होत असल्याने साखरेची चणचण बाजारपेठेत निर्माण झाली आहे.

ब्राझील इथेनॉल व साखर किती प्रमाणात तयार करेल याची शाश्वती बाजारात नाही. ब्राझीलने यंदाही इथेनॉलला प्राधान्य दिले, तर पुन्हा साखर कमी येईल या अपेक्षेने दरात वाढ होत आहे.

Sugar Market
Sugar Market : उन्हाळ्यात कारखानदारांना साखर दरवाढीचा गारवा

सध्या ब्राझीलचा साखर हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण अजूनही ज्या प्रमाणात ब्राझीलची साखर आंतरराष्ट्रीय बाजारपेठात पोहोचणे आवश्यक होते तितक्या प्रमाणात ती पोहोचलेली नाही. ब्राझीलच्या ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये काही भागातून यंदाही साखरेचे उत्पादन घटत आहे.

Sugar Market
Sugar Market : मे महिन्यात कारखान्यांना २४ लाख टन साखर विक्रीचा कोटा

सुरुवातीला जितके अंदाज ब्राझीलच्या संघटनेंनी वर्तवले होते. तितक्या अंदाजापेक्षा काही प्रमाणात घट साखर उत्पादनात असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीमुळे जागतिक बाजारात नेमकी किती साखर येईल याचा अंदाज व्यक्त करणे कठीण बनले आहे

गेल्या वर्षी निर्यातीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारताची यंदा मात्र फारच पीछेहाट झाली. गेल्या वर्षी ११२ लाख टन साखर निर्यात झाली होती. त्या तुलनेत आतापर्यंत ६० लाख टन साखरेची निर्यात झाली आहे.

यंदा भारतात घटलेले साखर उत्पादन व स्थानिक बाजारात वाढणाऱ्या किमतींमुळे केंद्र सरकार यापुढे निर्यातीला परवानगी देईल ही शक्यता धूसर बनली आहे.

परिणामी केवळ जागतिक बाजारात वाढणाऱ्या किमती पाहत राहण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय भारतीय साखर कारखानदारांना उरला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com