Soybean : सोयाबीन, हळद, कापसाच्या किमतींत घट

MCX ने कापसाच्या जानेवारी २०२३ डिलिवरीचे व्यवहार २९ तारखेपासून बंद केले आहेत. फेब्रुवारीपासूनच्या पुढील व्यवहारांची सुरुवातसुद्धा लांबणीवर टाकली आहे.
Soybean Cotton
Soybean CottonAgrowon

फ्युचर्स किमतीः सप्ताह- २० ते २६ ऑगस्ट २०२२

MCX ने कापसाच्या (Cotton) जानेवारी २०२३ डिलिवरीचे व्यवहार २९ तारखेपासून बंद केले आहेत. फेब्रुवारीपासूनच्या पुढील व्यवहारांची सुरुवातसुद्धा लांबणीवर टाकली आहे. कापूस करारांच्या तपशीलातील बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे ही बंदी घातली आहे असे त्यासंबंधीच्या पत्रकात म्हटले आहे. आता मूग (Moong) वगळता सर्वच पिकांची आवक कमी होऊ लागली आहे. नवीन मुगाची आवक (Green Gram Arrival) १२ तारखेपासून सुरु झाली आहे. सध्या कर्नाटक व मध्य प्रदेशातून ती होत आहे. कांदा व टोमॅटो (Tomato) यांची आवक कमी होऊ लागली आहे.

२६ तारखेस संपणाऱ्या सप्ताहात मूग वगळता सर्वच वस्तुंच्या किमती कमी झाल्या. सोयाबीनच्या किमती सर्वाधिक ९.५ टक्क्यांनी घसरल्या. कापसाच्या किमतीत सुद्धा १.५ टक्क्यांची घट झाली. मुगाच्या किमती किंचित वाढल्या.

Soybean Cotton
Turmeric : हळदीच्या वायद्यांवर बंदी नकोच !

या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जुलै महिन्यात घसरत होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.४ टक्क्यांनी घसरून रु. ४७,०७० वर आले आहेत. ऑक्टोबर डिलिवरी भाव ३.४ टक्क्यांनी घसरून रु. ३८,८५० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ०.९ टक्क्यांनी घसरून रु २,३१९ वर आले आहेत. यंदाच्या हंगामासाठी कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रती क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.

Soybean Cotton
Cotton Market: नवीन कापसालाही चढा दर |ॲग्रोवन

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती ६.४ टक्क्यांनी वाढून रु. २,५०० वर आल्या आहेत. फ्युचर्स (सप्टेंबर डिलिवरी) किमतीसुद्धा ०.७ टक्क्यांनी घसरून रु. २,५५० वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स किमती रु. २,५६० वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,९६२ आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ७,४६७ वर स्थिर आहेत. सप्टेंबर फ्युचर्स किमती १.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,२४८ वर आल्या आहेत.

Soybean Cotton
Soybean : सोयाबीनचा पीकविमा पेरणीक्षेत्रापेक्षा अधिक

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,६८१ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ६,२७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. नवीन मुगाची आवक आता बाजारात होऊ लागली आहे. यात कर्नाटक राज्याचा हिस्सा ६५ टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेश (१८ टक्के) आहे. महाराष्ट्रातील आवकसुद्धा वाढत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) जुलै महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ४.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,१६४ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा ९.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,५८१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) जुलै महिन्यात वाढत होती. या सप्ताहात ती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,६४० वर आली आहे. हमीभाव प्रति क्विंटल रु. ६,६०० जाहीर झाला आहे.

कांदा

कांद्याच्या किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२७० होती; या सप्ताहात ती रु. १,२५० वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती आतापर्यंत घसरत होत्या. या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. ९०० पर्यंत आली आहे. गेल्या सप्ताहापासून टोमॅटोची आवक उतरता कल दाखवत आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com