Vegetable Market Rate : सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर

पुणे बाजारसमितीची स्थिती; पावसाने थोडी उसंत दिल्याने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ
Vegetable Market Rate
Vegetable Market RateAgrowon

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रविवारी (ता. १८) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) झाली होती. राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या पावसाने थोडी उसंत दिल्याने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली होती. मात्र भाजीपाल्यात (Vegetable Market Rate) भिजलेल्या मालाचा समावेश असल्याने चांगल्या दर्जाच्या भाजीपाल्याला चांगले दर होते. तर पितृपंधरवडा सुरू असल्याने भेंडी, गवार, तांबडा भोपळा आणि पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाल्याने दर काही प्रमाणात वाढले होते. तर बहुतांश सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

Vegetable Market Rate
Vegetable Rate : कळमना बाजारात पालेभाज्यांच्या दरात तेजी

परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे ५ टेम्पो, कर्नाटक येऊन ३ टेम्पो घेवडा आणि भुईमूग २ टेम्पो, गुजरात येथून ३ ट्रक कोबी आणि इंदौर येथून गाजर ८ टेम्पो आवक झाली होती.

तर राज्याच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार पोती, टॉमेटो सुमारे १० हजार क्रेट, फ्लॅावर १० तर कोबी सुमारे ५ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे ५० पोती, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ८ टेम्पो, तांबडा भोपळा टेम्पो १०, मटार सुमारे ३०० गोणी आवक झाली होती. तर कांदा ६० तर बटाटा सुमारे ४० ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची १० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : ८०-१३०, बटाटा : १८०-२२०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-४००, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान ७५०-८५०, सुरती ३५०-४००, टोमॅटो : १२०-१४०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १४०-१६०, चवळी : ३५०-४००, काकडी : १२०-१४०, कारली : हिरवी २००-२५० पांढरी - २५०-३००, पापडी : ६००-७००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : १००-१२०, वांगी : २००-२५०, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : २००-२५०, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१५०, शेवगा : ६००-७००, गाजर : २००-२५०, वालवर : ३००-४००, बीट : १४०-१६०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १००-१४०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३५०-४००, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार : ७००-१००० पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : १२०-१४०, कैरी तोतापुरी - ८००-९०० गावरान - ४५०-५००, सुरण : २००-२५०, मका कणीस : १००-१२०, नारळ (शेकडा) : १५००-२०००.

Vegetable Market Rate
Vegetable Market : नगरला भाजीपाल्याची आवक वाढली

पालेभाज्या तेजीत

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सव्वा लाख तर मेथीची ५० हजार जुड्या आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : २०००-३५००, मेथी : ८००-१५००, शेपू : ६००-१२००, कांदापात : १४००-२०००, चाकवत : ४००-७००, करडई : ४००-७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : १०००-२०००, राजगिरा : ४००-८००, चुका : ६००-१२००, चवळई : ४००-७००, पालक : १०००-२०००.

फळबाजार

फळ बाजारात रविवारी (ता.१८) लिंबाची सुमारे एक हजार गोणी आवक झाली होती. तर डाळिंब सुमारे ३० टन, मोसंबी सुमारे ७० टन, संत्रा १० टन, पपई ५ टेम्पो, सीताफळ २० टन पेरू ७०० क्रेटस कलिंगड ४ तर खरबूज प्रत्येकी २ टेम्पो आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे

लिंबे (गोणीस) - ६००-१०००, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ४०-१५०, आरक्ता १०-८०, पपई प्रति किलो -१५-२५, पेरू (२० किलो) -३००-५००, सीताफळ - २०-८०, कलिंगड १५-२१ खरबूज २५-४०, मोसंबी ३ डझन १२०-२५०, ४ डझन ४०-१२०. संत्रा (१० किलो) २००-६००.

फुलबाजार

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, अष्टर : जुडी १०-२०, सुट्टा ८०-१२०, बिजली : २०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ४०-७०, जर्बेरा : २०-३०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी १००-१५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ६०-८०.

मटण मासळी

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे २० टन, खाडीची सुमारे ३०० किलो तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे : १०००-१३००, मध्यम : ९००-१०००, लहान : ६५०-८००, भिला : ५००-५५०, हलवा : ५५०-६००, सुरमई : ४००-६००, रावस : ६००-९००, घोळ : ६५०-७५०, करली : ३००-४००, करंदी (सोललेली) : ४४०-४८०, भिंग : ३६०-४००, पाला : ७५०-१२००, वाम : ५००-८००, ओले बोंबील : १८०-२८०.

कोळंबी : लहान १६०-२८०, मोठी : ५५०-७५०, जंबोप्रॉन्स : १२००-१४००, किंगप्रॉन्स : ८००-८५०, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : २४०-३२०, मांदेली : १२०-१८०, राणीमासा : १४०-२००, खेकडे : २४०-३६०, चिंबोऱ्या : ४८०-६००.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०-३२०, खापी : २४०-३२०, नगली : ३६०-४००, तांबोशी : ३६०-४००, पालू : २००-२४०, लेपा : १२०-२८०, बांगडा : २००-२८०, शेवटे : ३२०-३६०, पेडवी : ८०-१००, बेळुंजी : १००-१६०, खुबे : १००-१४०, तारली : १८०-२००.

नदीतील मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १४०-१६०, मरळ : ३६०-४००, शिवडा : २००-२४०, खवली : २४०-२८०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २४०-३६०, वाम : ५५०-६००.

मटण : बोकडाचे ६६०, बोलाईचे ६६०, खिमा ६६०, कलेजी ७००.

चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३२०.

अंडी : गावरान (शेकडा) ९२०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ४६५, डझन ६६, प्रतिनग ५.५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com