Commodity Market : आंतरराष्ट्रीय शेतीमाल बाजारात दर नरमले

अमेरिकेच्या वायदे बाजारात बुधवारी शेतीमालाच्या किंमतींत घसरण पाहायला मिळाली. सोयाबीन, सोयापेंड, मका, गहू, तांदूळ या शेतीमालाच्या वायद्यांत घट झाली.
Wheat
WheatAgrowon

पुणेः अमेरिकेच्या वायदे बाजारात (Future Market America) बुधवारी शेतीमालाच्या किंमतींत (Agriculture Commodity Rate) घसरण पाहायला मिळाली. सोयाबीन (Soybean), सोयापेंड (Soymeal), मका (Maize), गहू (Wheat), तांदूळ (Rice) या शेतीमालाच्या वायद्यांत घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर (International Market Rate) कमी होण्याची कारणे काय? याचा परिणाम देशातील बाजारावर होईल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

बुधवारी शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सीबाॅटवर सोयाबीन, सोयापेंड, मका, गहू, तांदूळ या शेतीमालांच्या वायद्यांत काहीशी घसरण झाली. सोयाबीनचे ऑगस्टचे वायदे एक टक्क्यांनी घसरले. सोयाबीनचे वायदे १४.६३ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. तर सोयापेंडेचे डिसेंबरचे वायदे दीड टक्क्याने घसरून ३८६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले. तर सोयातेलच्या वायद्यांत काहीशी सुधारणा झाली होती. मक्याच्या वायद्यांत घट झाली. मक्याचे सप्टेंबरचे वायदे ५.९३ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. तर गव्हाचे वायदे ८.११ डाॅलर बुशेल्सने पार पडले. गव्हाच्या दरातही काहीशी घसरण झाली होती.

Wheat
Soybean : अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटणार

अमेरिकेच्या कमोडिटी बाजारात चढ-उतार सुरु आहेत. कोरोनानंतर विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आता सुरळीत होत आहे. तर रशिया आणि युक्रेनमध्ये धान्य निर्यातीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरु आहे. टर्कीमधील इस्तंबुल शहरात यासंदर्भातील बोलणी होत आहेत. या चर्चेत युरोपिय युनियनचेही प्रतिनिधी सहभागी झाल्याचे वृत्त आहे.

Wheat
तुम्हाला काळा गहू माहित आहे का?

दुसऱ्या बाजूला जगातिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. जगातील सर्वच देशांत महागाई दर वाढलेला आहे. अमेरिकेतही सध्या महागाई दर ९.१ टक्क्याच्या दरम्यान आहे. महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमेरिकन फेडरल बॅंकेने व्याजदारत वाढ केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर हेज फंड्स कमोडिटी बाजारातून बाहेर पडत आहेत. हे फंड्स आता करन्सी मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे डाॅलरची स्थिती मजबुत झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कमोडिटी बाजारात पडझड सुरु झाल्याचे दिसते.

अमेरिकेत मागील काही दिवसांत उष्ण वातावरण होते. त्यामुळे या भागातील मका आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादनाबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता मका आणि सोयाबीन उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रदेशांत पाऊस झाला. त्याचा परिणाम बाजारातील व्यवहारांवर दिसून आला. तर इजिप्तने अमेरिकेतून गहू खरेदीचा करार रद्द केल्याचे पडसाद बाजारात उमटले, असे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या शेतीमालाचे दर नरमले. त्यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. याचा देशातील बाजारावरही परिणाम होत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यास त्याचा परिणाम देशातील दरवरही जाणवतो.
सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार विश्लेषक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com