China Production : चीनमधील उत्पादन घटले

चीनमधील उत्पादनात ऑक्टोबर महिन्यात घट झाल्याची नोंद एका अधिकृत सर्व्हेमध्ये सोमवारी (ता. ३१) करण्यात आली आहे.
China
China Agrowon

बीजिंग (वृत्तसंस्था) ः चीनमधील उत्पादनात (China Production) ऑक्टोबर महिन्यात घट झाल्याची नोंद एका अधिकृत सर्व्हेमध्ये सोमवारी (ता. ३१) करण्यात आली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष मंदीवर उपाय करीत असताना उत्पादनात घट आल्याचे या पाहणी अहवालात म्हटले आहे.

China
China Drought : दुष्काळामुळे चीनमध्ये धान्य उत्पादन घटणार

मासिक खरेदी व्यवस्थापन निर्देशांक सप्टेंबरमधील ५०.१ वरून ऑक्टोबर महिन्यात ४९.२ पर्यंत खाली आला आहे. या निर्देशांकातील १०० गुण श्रेणीत ५० पेक्षा कमी श्रेणी म्हणजे उत्पादनातील घट दर्शविते, अशी माहिती सरकारी सांख्यिकी विभाग आणि अधिकृत उद्योजक गटाने दिली. देशातील उत्पादनवाढीसाठीचे उपाय, नवी मागणी आणि रोजगार खालावला असल्याचे ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड चायना फेडरेशन ऑफ लॉजिस्टिक्स अँड पर्चेसिंग’ या संस्थेने जाहीर केले.

चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून वारंवार होणाऱ्या लॉकडाउनमुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होत आहे. तसेच या वर्षाच्‍या अखेरीस चीनमधील जागतिक निर्यात थंडावणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर चिनी उत्पादन घटण्याचे निरीक्षण महत्त्वाचे मानले जात आहे. यावर्षी चीनची वार्षिक विकास दर ३ टक्के आहे. १९८० च्या दशकातील नीचांकी विकासदराची ही दुसरी वेळ आहे.

चीनमध्ये कोरोना वारंवार डोके वर काढत असल्याने यंदा विकासदर आणखी खालवणार आहे. निर्यातीवरही याचे सावट आहे.
झिशुन हुआंग, सदस्य कॅपिटल इकॉनॉमिक्स

चीनमधील व्यापार (२०२२ मधील टक्क्यांत)

५.७

सप्टेंबरमधील निर्यात

ऑक्टोबरपर्यंत निर्यात

०.३

आयात

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com