Turmeric Production : देशात यंदा १३ लाख टन हळदीचे उत्पादन शक्य

देशात यंदाच्या हंगामात ३ लाख ५६ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. सध्या हळद पिकास पोषक वातावरण आहे.
Turmeric
TurmericAgrowon

सांगली : देशात यंदाच्या हंगामात ३ लाख ५६ हजार हेक्टरवर हळदीची लागवड (Turmeric Cultivation) झाली आहे. सध्या हळद पिकास पोषक वातावरण आहे. १३ लाख टनांपर्यंत हळदीचे उत्पादन (Turmeric Production) होईल, असा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

Turmeric
Turmeric Pest Disease : कीड-रोग नियंत्रणावर द्या भर

देशात गेल्या दोन वर्षांपासून हळदीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. २०२०-२१ मध्ये देशात २ लाख ९२ हजार ८७६ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. दोन वर्षांपूर्वी हळदीला चांगले दर मिळाले. यामुळे हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे २०२१-२२ मध्ये ३ लाख ४९ हजार ६४२ लाख हेक्टरवर हळदीचे क्षेत्र होते. अर्थात, देशात गतवर्षी ५६ हजार ७६६ हेक्टरने हळदीची लागवड वाढली आहे. उत्पादनही वाढू लागले आहे.

Turmeric
Turmeric Management : हळद कंदाच्या वाढीचे व्यवस्थापन

यंदा देशात ३ लाख ५६ हजार हेक्टरवर हळदीचे क्षेत्र आहे. दरवर्षी देशात हळदीचे क्षेत्र २० ते २५ टक्क्यांनी वाढते. वास्तविक पाहता हळदीला मागणी असली, तरी उत्पादन अधिक झाल्याने गेल्या वर्षी हळदीच्या दरात फारशी तेजी दिसून आली नाही. गतवर्षीपेक्षा यंदा ६ हजार ३५८ हेक्टरने हळदीचे क्षेत्र वाढले आहे, असा दावा हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला.

Turmeric
Turmeric Rate : मंदीतही हळदीचे दर टिकून

यंदाच्या हंगामात हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित पाऊस झाला. हळद लागवडीपासून पिकास पुरेसा पाऊस आणि पोषक असे वातावरण होते. यामुळे हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. मात्र ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने हळद पिकाचे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र फारसे नुकसान झाले नाही. सध्या हळद पिकास पोषक वातावरण आहे

उत्पादन वाढण्याची शक्यता

गेल्या तीन वर्षांपासून देशात हळदीचे उत्पादन वाढत आहे. गतवर्षी देशात १३ लाख ३० हजार ९२ टन इतक्या हळदीचे उत्पादन झाले. २०२०-२१ या वर्षात ११ लाख २३ हजार ८५७ टन हळदीचे उत्पादन मिळाले. यंदा हंगामात गेल्या वर्षी इतकेच हळदीचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

निर्यातही वाढण्याची आशा

देशातून हळदीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. २०२१-२२ मध्ये १ लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली होती. या वर्षी निर्यात वाढेल, अशी आशा आहे.

यंदा हळदीचे क्षेत्र गतवर्षी पेक्षा कमी आहे. पोषक वातावरण आहे. हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव नाही. यंदा पीक चांगले आहे. उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी,

हळद संशोधन योजना, कसबेडिग्रज, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com