Chana MSP Procurement : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता जाहीर

एकीकडे आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीचा घोळ सुरू असतानाच कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार रब्बी हंगाम २०२२-२३ साठी हरभरा खरेदीकरिता हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

Chana Procurement जालना : एकीकडे आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) ऑनलाइन नोंदणीचा घोळ सुरू असतानाच कृषी विभागाच्या (Agriculture Department) द्वितीय अंदाजानुसार रब्बी हंगाम २०२२-२३ साठी हरभरा खरेदीकरिता हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

ही उत्पादकता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा उत्पादित हरभरा (Chana Rate) कमीत कमी कसा खरेदी केला जाईल याच पद्धतीची असल्याचे सूर आता शेतकरी वर्गातून उमटत आहे.

आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी २७ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात २७ फेब्रुवारीला पोर्टल सुरू न झाल्याने नोंदणी सुरूच झाली नव्हती.

Chana Rate
Chana Rate : खानदेशात हरभरा दर स्थिर

कदाचित २८ फेब्रुवारीला ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल, अशी आशा आहे. एकीकडे ऑनलाइन नोंदणीचा घोळ सुरू असतानाच कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी रब्बी हंगाम २०२२-२३ करिता आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

Chana Rate
Chana Market : हरभरा नोंदणीसाठी झुंबड का उडाली?

एकरी उत्पादन जास्त होत असताना खरेदीसाठीच्या उत्पादकता मर्यादित उत्पादित हरभरा विकावा कसा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडतो आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्पादकतेला धरून शेतकऱ्यांमधून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे हरभरा खरेदीसाठीची तारीख अजून जाहीर झाली नसल्याने त्यापूर्वी उत्पादकता जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होते आहे.

हरभरा खरेदीसाठी उत्पादकता (हेक्टरी, क्विंटलमध्ये)

छत्रपती संभाजीनगर... ८

जालना.. १४.५५

बीड... १५

लातूर... १३

उस्मानाबाद...११.५०

नांदेड... १५

परभणी... १२.५०

हिंगोली १२

Chana Rate
Chana Market : रब्बी हरभरा खरेदीला कधी मिळणार मुहूर्त?

पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणेच उत्पादकतेचा खोडा घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला उत्पादित हरभरा विकण्यात अडचणी येणार हे स्पष्ट आहे. आमच्याकडे एकरी उत्पादन जास्त असताना जाहीर उत्पादकतेनुसार खरेदी झाल्यास उत्पादित हरभरा आधारभूत किमतीने विकणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही.

- भगवानराव डोंगरे, जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com