Agriculture Economy : शेतीमालाच्या किमती वाढूनही नफा मर्यादित

अमेरिका आणि युरोपीय समूहानं रशिया आणि बेलारूसवर निर्बंध घातल्यानं या देशातून होणारी पोटॅश, फॉस्फेट खतांची निर्यात घटली. त्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप किंवा आखाती देशांतून खतांची जास्त दरानं आयात करावी लागतेय.
Agriculture Economy
Agriculture EconomyAgrowon

पुणेः शेतीमालाचं उत्पादन (Agriculture Production) घटल्यानं त्यांच्या किमती वाढत आहेत. मात्र त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नफ्यात (Farmer's Profit) वाढ होत नसल्याचं दिसतंय. कारण रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia Ukraine War) खनिज तेलाच्या, डिझेलच्या किमती भडकल्या. रशिया युरोपचा गॅस पुरवठा (Gas Supply) कमी करणार असल्यानं गॅस आणि विजेच्या किमती गगनाला भिडल्या. या सगळ्यांचा भारतीय शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे.

Agriculture Economy
Family's Economy : कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक

अमेरिका आणि युरोपीय समूहानं रशिया आणि बेलारूसवर निर्बंध घातल्यानं या देशातून होणारी पोटॅश, फॉस्फेट खतांची निर्यात घटली. त्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप किंवा आखाती देशांतून खतांची जास्त दरानं आयात करावी लागतेय. गॅसच्या किमती वाढल्यानं युरियाचे दरही वाढले आहेत.

Agriculture Economy
Agriculture Economy : शेतीतलं मुळं दुखणं काय आहे ?

यापूर्वी शेतीमालाच्या किमती वाढल्या की शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ व्हायची. त्यामुळे शेतकरी लगोलग उत्पादन वाढीकडे वळायचे. अमेरिकेत सोयाबीनचं किंवा मक्याचं उत्पादन कमी झालं की अर्जेंटिना किंवा ब्राझीलमधील शेतकरी काही महिन्यांतच उत्पादन वाढवत. त्यामुळं साहजिकच वाढत्या किमतींना आळा बसायचा. पण आता डिझेल आणि खतांच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नफा घटला. त्यातच खराब हवामानामुळं पिकाची उत्पादकता कमी राहण्याची किंवा संपूर्ण पीकच हातातून जाण्याची भीती वाढली आहे.

याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांकडून उत्पादनवाढीसाठी जोरकस प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यातच या वर्षी दोन दशकात प्रथमच सलग तिसऱ्या वर्षी ‘ला-निना’ आला. ज्यामुळं अमेरिकेतील अनेक राज्यांसोबत अर्जेंटिना, ब्राझील आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये दुष्काळ आणखी भीषण रूप धारण करू शकतो. तर ऑस्ट्रेलिया, भारत, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत अतिवृष्टी होऊन पिकांची नासाडी होऊ शकते.

थोडक्यात, बाजारभाव चांगले असूनही निविष्ठांच्या अधिक किमती आणि प्रतिकूल हवामानामुळं लागलीच उत्पादन वाढवणं शक्य नाही. सोयाबीन, मका आणि गहू यांच्या किमती आकर्षक असल्यानं दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायचं आहे. मात्र जमिनीत पुरेशी ओल नसल्यानं उत्पादन वाढवणं दूर, सरासरीएवढं उत्पादन घेणंही त्यांना अवघड वाटत आहे. नेहमीपेक्षा जास्त थंड हिवाळ्यामुळे अमेरिका आणि युरोपमधील पिकांची उत्पादकता धोक्यात येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com