पावसामुळे टोमॅटोच्या दरात वाढः केंद्रीय अन्नसचिव

पुढील दोन आठवड्यात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये टोमॅटोचे दर स्थिर होतील, असा दावा केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी केला.
पावसामुळे टोमॅटोच्या दरात वाढः केंद्रीय अन्नसचिव
TomatoAgrowon

पुढील दोन आठवड्यात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये टोमॅटोचे (Tomato) दर स्थिर होतील, असा दावा केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे (Sudhanshu Pandye) यांनी केला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोचे दर भडकले आहेत. स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोचा किरकोळ विक्रीचा दर प्रति किलो ५० ते १०६ रुपये इतका झाला आहे. महाराष्ट्रातही हीच अवस्था आहे.

दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली, अशी माहिती पांडे यांनी दिली. केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरले आहे. देशात वाढत्या महागाईला रोखण्यासाठी विविध निर्णयाचा धडका लावला आहे. परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. दिल्ली वगळता देशातील सर्व प्रमुख महानगरांमध्ये टोमॅटो दर वाढले आहेत. पांडे यांनी सांगितले की, उत्पादनात मोठी घट नाही, त्यामुळे पुरवठ्याच्या बाजूने समस्या नाही. या विषयावर राज्य सरकारांशीही चर्चा करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यांत दर कमी होतील, असे ते म्हणाले.

मुंबईतील बाजारात नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पाठवला जातो. बाहेर राज्यांपैकी केरळ आणि कर्नाटकातून टोमॅटोची मोठी आवक होते. महाराष्ट्रातही स्थानिक बाजारांत टोमॅटोचे दर वाढले आहेत.

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील विविध भागात टोमॅटोचे दर ४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मुंबई आणि कोलकाता शहरात टोमॅटोचे ७७ रुपये किलो या दरानेही टोमॅटो विकले गेले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com