Raisin Market Rate : बेदाण्याचे दर टिकून

यंदाच्या हंगामात बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सध्या बेदाण्याला मागणी कमी आहे. यामुळे गेल्या महिन्यात बेदाण्याचे दर प्रतिकिलोस पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत.
Raisin Rate
Raisin Rate Agrowon

Raisin Market Rate यंदाच्या हंगामात बेदाण्याचे विक्रमी उत्पादन (Raisin Production) झाले आहे. सध्या बेदाण्याला मागणी कमी आहे. यामुळे गेल्या महिन्यात बेदाण्याचे दर (Raisin Rate) प्रतिकिलोस पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत.

मात्र गेल्या आठवड्यात प्रतिकिलोस प्रतवारीनुसार ९० रुपयांपासून १६० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या हे दर टिकून आहेत. सध्या बेदाण्याच्या दरात फारशी तेजी येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बेदाण्याला वर्षभर मागणी असते. सण, समारंभाच्या दरम्यान बेदाण्याची मागणी वाढते. त्यानुसार बेदाणा उत्पादक त्याच्या विक्रीचे नियोजन करतो. मुळात बेदाणा निर्मितीचा यंदा हंगाम उशिरा सुरू झाला.

सुरुवातीपासून पोषक वातावरण असल्याने बेदाणा निर्मितीस अडथळा आला नाही. मात्र हंगाम अंतिम टप्प्यात असताना वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे बेदाण्याचे नुकसान झाले.

Raisin Rate
Raisin Market : कवठेमहांकाळमध्ये एक हजार टन बेदाणा मातीमोल

राज्यामधील बेदाणा हंगाम निर्मितीचा काळ संपला असून सुमारे २ लाख ५० हजार टन इतके उत्पादन होण्याची शक्यता आहे अर्थात गतवर्षीपेक्षा यंदा ५० ते ६० हजार टन वाढेल. हंगामाच्या सुरुवातीपासून बाजारपेठेत बेदाण्याची मागणी कमी-अधिक होत होती. त्यामुळे दरात चढ-उतार पाहायला मिळाले.

Raisin Rate
Raisin Production : निर्यातक्षम द्राक्षमालाचे मनुके करण्याची वेळ

मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात बेदाण्याला प्रतिकिलोस १०० ते २१० रुपये असा दर होता. त्यानंतर बाजारात बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागली. या दरम्यान लग्न समारंभ आणि बेकरीसाठी लागणारा बेदाणा बहुतांश खरेदी झाला आहे. त्यामुळे मागणी घटली असल्याचे चित्र आहे.

मार्चमध्ये असणारा दर एप्रिलच्या मध्यापासून कमी होण्यास सुरुवात झाली. या आठवड्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. येत्या काळात बेदाणा दरात फारशी तेजी होणार नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बेदाणा दर (प्रतिकिलो)

हिरवा बेदाणा...१०० ते १६०

पिवळा बेदाणा...९० ते १५०

काळा बेदाणा...३० ते ५०

यंदा बेदाण्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. बाजारपेठेत बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचे सूत्र बिघडले आहे. त्यामुळे बेदाणा दरात घसरण झाली आहे.
- राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा मर्चंट असोसिएशन.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com