Tur Rate : तुरीला दराची फोडणी मिळणार

देशातील कडधान्य लागवड कमी होण्यामागं काही कारणं आहेत. त्याममध्ये प्रमुख कारण म्हणजे लागवडीच्या काळात पडलेला पावसाचा खंड. यंदा जून महिन्यात देशातील बहुतांशी भागांमध्ये लागवडीयोग्य पाऊस झाला नाही. तर जुलै महिन्यात पहिल्या दोन आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी-जास्त राहीलं.
Tur Rate
Tur RateAgrowon

पुणेः देशात सध्या तुरीसह इतर कडधान्याचे दर (Pulses Rate) वाढलेले आहेत. त्यातच केंद्रीय कृषी विभागानं (Union Ministry Of Agriculture) आज प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार देशातील कडधान्य लागवड (Pulses Cultivation) ४ टक्क्यांनी घटली. यात तुरीचा पेरा (Tur Sowing) जवळपास ५ टक्के कमी झालाय. विशेष म्हणजे लागवडीच्या काळात तुरीला चांगला दर (Tur Rate) मिळत होता. त्यामुळं तूर लागवड वाढेल, असा अंदाज होता.

Tur Rate
Tur Disease : तुरीवरील एरिओफाइड माइटचे नियंत्रण

देशातील कडधान्य लागवड कमी होण्यामागं काही कारणं आहेत. त्याममध्ये प्रमुख कारण म्हणजे लागवडीच्या काळात पडलेला पावसाचा खंड. यंदा जून महिन्यात देशातील बहुतांशी भागांमध्ये लागवडीयोग्य पाऊस झाला नाही. तर जुलै महिन्यात पहिल्या दोन आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी-जास्त राहीलं. त्याचाही परिणाम लागवडीवर झाला. दुसरं म्हणजे मागील हंगामात तूर, मूग आणि उडीद पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. परिणामी पुरवठा मर्यादीत होता. मात्र सरकारनं विक्रमी आयात करून दर दबावात ठेवले. २०२१-२२ मधील तूर आयात दुपटीने वाढून ८ लाख ६० हजार टनांवर पोचली. त्यामुळं शेतकऱ्यांना सरासरी ६ हजार रुपये दर मिळाला. त्याचवेळी कापूस आणि सोयाबीनचे दर तेजीत होते. त्यामुळं सहाजिकच शेतकऱ्यांची पसंती या दोन पिकांना जास्त मिळण्याचा अंदाज होता.

Tur Rate
Tur Import : आफ्रिकेतून तूर आयात का वाढतेय?

लागवडीचं चित्र काय?

देशात आजपर्यंत तुरीची जवळपास ४६ लाख हेक्टरवर लागवड झाली. तर मागील वर्षी याच काळात जवळपास ४८ लाख हेक्टर क्षेत्र तुरीखाली होतं. म्हणजेच पेरा जवळपास ५ टक्क्यांनी कमी झाला. तर सध्या देशात तुरीची टंचाई जाणवत आहे. मात्र देशातील नवी तूर नोव्हेंबरपासून बाजारात येईल. म्हणजेच देशात लगेच पुरवठा वाढणार नाही. त्यामुळं सध्या तुरीचे दर वाढलेले आहेत.

आयात तुरीचे दर काय?

भारताला पुढील तीन महिने आयातीवर अवलंबून राहावं लागणार आहे. भारताची मागणी लक्षात घेऊन निर्यातदार देशांनीही तुरीचे दर वाढवले आहेत. बर्मा या देशानं तुरीचे दर टनामागे २५ डाॅलर तर इतर तुरीचे दर १५ डाॅलरनं वाढले आहेत. आता बर्माची लेमन तूर ९२५ डाॅलर म्हणजेच ७३ हजार ८२४ रुपये प्रतिटनानं मिळतेय. तर सुपर क्वालिटीची तूर १ हजार १५ डाॅलर म्हणजेच ८१ हजारांवर पोचली. याचाच अर्थ असा होतो की आयात तूर ७३०० ते ८१०० रुपयाने मिळत आहे.

दर काय राहू शकतात?

देशातील तूर पिकाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं तूर उत्पादकता किमान २० टक्क्यांपर्यंत कमी येऊ शकते, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. परतीच्या पावसाचाही परिणाम तूर पिकावर होत असतो. त्यामुळं उद्योग यंदा २७ ते ३२ लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करत आहे. आयात तूर ८ लाख टन गृहीत धरली तरी देशात ३५ ते ४० लाख टनांचा पुरवठा होईल. मात्र देशाची गरज ४४ लाख टनांची असते. म्हणजेच तुरीचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळं तुरीला यंदा चांगला दर मिळेल. शेतकऱ्यांनी किमान ८ हजार रुपयांचा दर लक्षात ठेऊन बाजाराचा आढावा घेऊन विक्री करणं फायदेशीर ठरेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com