Grape Market Rate : द्राक्षांना मिळेना दर

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचे दर कोसळले आहेत. योग्य दर मिळत नसल्याने द्राक्ष विक्रीचा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.
Grape Market
Grape MarketAgrowon

Solapur Grape Market: अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांचे दर (Grape Rate) कोसळले आहेत. योग्य दर मिळत नसल्याने द्राक्ष विक्रीचा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. बार्शी तालुक्यातील गुळपोळी, मालवंडी, सुर्डीसह मानेगाव परिसरातील द्राक्ष पट्ट्यात (Grape Belt) त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

बार्शी तालुक्यातील गुळपोळीसह मालवंडी, सुर्डी, मानेगाव परिसरात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र या वर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून द्राक्ष दरात प्रचंड घसरण झाली आहे.

दहा वर्षांपूर्वी मिळणारे दर आता मिळत असल्याचे अभूतपूर्व चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे. यंदा द्राक्षाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच बँकांनी कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावला आहे.

यंदा द्राक्षाला किमान ४० ते ५० रुपये किलोपर्यंत भाव मिळेल, दोन वर्षांत झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सध्या द्राक्षाला २० ते २५ रुपये किलो भाव मिळत आहेत.

Grape Market
Grape Orchard : संभाव्य पावसाळी स्थितीमध्ये द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना

उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांनी प्रचंड खर्च करून द्राक्षाचे उत्पादन घेतले. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चांगला भाव मिळत होता.

मात्र मराठवाड्यासह राज्यात पडलेल्या अवकाळीनंतर दरात प्रचंड घसरण झाली. द्राक्षासाठी केलेला खर्च वसूल करणेही अवघड झाले असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी नागेश बारवकर व भागवत चिकणे यांनी सांगितले.

Grape Market
Grape Orchard Management : अवकाळी पावसात द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन

यंदा द्राक्ष बागांना रोगाचा फारसा फटका बसला नाही. त्यामुळे चांगले उत्पादन झाले. द्राक्षाच्या माणिकचमन, एस. एस. जम्बो, आर. के. या वाणाच्या द्राक्षांची किंमत ही एकच असल्याने कोणत्याच द्राक्षाला दर नसल्याची परिस्थिती आहे.

शिवाय एकाच टप्प्यात ही द्राक्ष तोडणीस आल्याने व इतर ठिकाणची द्राक्ष बाजारात दाखल झाल्याने दरात कमालीची घट झाली असल्याचे प्रवीण चिकणे व योगेश चिकणे यांनी सांगितले.

एजंट मात्र मालामाल

शेतकऱ्यांपेक्षा एजंट मोठे झाले आहेत. गावपातळीवर व्यापाऱ्याला जो एजंट बागा दाखवतो, त्याला किलोला एक रुपया कमिशन दिले जाते. जो व्यवहारात मध्यस्थी करून व्यापाऱ्याला द्राक्षाचे फोटो पाठवितो, त्याला किलोला दोन-तीन रुपये कमिशन दिले जाते. मात्र हा सर्व बोजा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यावरच आहे. यात गाव पातळीवरील एजंट मालामाल झाले आहेत.

सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही. या संकटातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान आहे. खते, औषधांचे वाढलेले दर, मजुरी, हप्ते यांचा मेळ ही बसू शकत नाही.
- शिरीश चिकणे, प्रगतिशील बागायतदार, गुळपोळी, ता. बार्शी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com