देशात खरंच हरभरा उत्पादन १३९.८ लाख टनांवर पोचलं?

केंद्र सरकारच्या अंदाजाशी उद्योग, जाणकार सहमत नाही
chana
chanaagrowon

पुणेः केंद्र सरकारनं २०२१-२२ मधील शेती उत्पादनाचा तिसरा सुधारित अंदाज जाहिर केला. यात हरभरा उत्पादन विक्रमी १३९.८ लाख टनांवर पोचेल, असं म्हटलं. मात्र यंदा पाऊस, धुकं आणि उष्णतेमुळं उत्पादन घटल्याचं शेतकरी आणि जाणकार सांगितात. त्यामुळं सरकारच्या या अंदाजाविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने( Central Government)नुकतचं देशातील शेती उत्पादनाचा तिसरा सुधारित अंदजा जाहिर केला. यात सरकराने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हरभऱ्याचं उत्पादन आत्तापर्यंतचं विक्रमी १३९.८ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केलाय. विशेष म्हणजेच सरकारचा दुसरा अंदाज १३१ लाख टनांचा होता. त्यात जवळपास ९ लाख टनांची भर घालण्यात आली. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे यंदा मार्च आणि एप्रिल १२२ वर्षांतील उष्ण ठरले. तसचं अनेक भागांत पाऊस, गारपीट आणि धुक्याचा पिकावर परिणाम झाला. या आपत्तींमुळे गव्हाचं(Wheat) उत्पादन घटल्याचं सरकारनं मान्य केलं. मात्र हरभरा उत्पादन वाढल्याचा दावा केला.

मात्र सरकारच्या या उत्पादन अंदाज जाणकारांना मान्य नाही. प्रक्रिया उद्योग आणि व्यापाऱ्यांनही यावर आश्चर्य व्यक्त केलं. वास्तविक सरकार तिसऱ्या अंदाजात हरभरा(Gram) उत्पादन कमी गृहित धरेल, असा दावा केला जात होता. तो गेव्हाच्या बाबतीतही होता. मात्र सरकरानं गव्हावर उष्णतेचा परिणाम झाल्याचं मान्य केलं. मात्र हरभरा उत्पैदनाला पोषक स्थिती होती, असा अप्रत्यक्ष दावाच केला. सरकारचा १३१ लाख टन उत्पादनाचा अंदाजच उद्योगाला मान्य नव्हता. आता तर सरकारनं त्यातच भर घातली. त्यामुळं सरकारनं उत्पादन वाढ धरताना कोणते घटक पुरक मानले? असा प्रश्न जाणकार उपस्थित करत आहेत.

जवळपास १३९.८ लाख टनांचा अंदाज व्यक्ते केला तरी उद्योगाचा अंदाज मात्र कमीच आहे. ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनने यंदा देशात ९५ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज दिला. तर इतर खासगी संस्थांचे अंदाज ९० ते १०५ लाख टनांच्या दरम्यान आहेत. शेतकऱ्यांसह विश्लेषक आणि उद्योगही देशातील हरभरा उत्पादक कमी असल्याचं मानलं. तर उत्पादन ११० लाख टनांच्या पुढे जाणार नाही, असं सांगितलं. मग सरकरानं आत्तापर्यंतचं विक्रमी उत्पादन होणार असं सांगितल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

यंदा हरभरा पेरणी वाढली होती. मात्र पाऊस, धुके आणि उन्हाचा पिकाला फटका बसला. त्यामुळं उत्पादकता घटली. आमच्या परिसरात यंदा हीच परिस्थिती होती.

गणेश नानोटे, शेतकरी, निंभारा, जि. अकोला

देशात यंदा पिकाला वातावरण आणि पावसाचा फटका बसला. त्यामुळं व्यापारी आणि उद्योगांनी सरकारच्या अंदाजाप्रमाणे उत्पादन होणार नाही, असं सांगितलं. माझ्या मते देशातील हरभरा उत्पादन यंदा १०० ते १०५ लाख टनांच्या दरम्यान स्थिरावेल.

राहूल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया, नवी दिल्ली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com