उष्णतेच्या लाटेमुळे कोळशाच्या किंमतीमध्ये वाढ

देशात उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) उकाड्यात वाढ झाली. त्यामुळे विजेची (Electricity) मागणी वाढली आहे. परिणामी जूनमध्ये कोळशाच्या किंमतीमध्ये (Coal Price) मे महिन्याच्या तुलनेत 17 टक्के वाढ झाली आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे कोळशाच्या किंमतीमध्ये वाढ
Electricity Agrowon

देशात उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) उकाड्यात वाढ झाली. त्यामुळे विजेची (Electricity) मागणी वाढली आहे. परिणामी जूनमध्ये कोळशाच्या किंमतीमध्ये (Coal Price) मे महिन्याच्या तुलनेत 17 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ प्रति टन 323.91 डॉलर अशी झाली आहे, अशी माहिती इंडोनेशियन मंत्रालयाने दिली आहे.

ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्रालयाचे प्रमुख अंगुग प्रिबादी म्हणाले, “भारत सरकारला देशातील वीज प्रकल्पांकडून होणारा साठा कमी पडत असल्यामुळे कोळशाची आयात वाढवली आहे. त्याचबरोबर चीनचाही कोळशाच्या किमतीवर प्रभाव राहिला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे युरोपमधील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. युरोपियन युनियनने ऑगस्टपासून रशियन कोळसा आयात बंद केली आहे. त्यामुळे युरोपियन खरेदीदार आशियाई कोळशाची मागणी करत आहेत.”

भारत आणि युरोपमधील वाढत्या मागणीमुळे इंडोनेशियनातील कोळशाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात काही भारतीय आयातीच्या निविदांवर स्वाक्षरी होईल, अशी चर्चा सुरू आहे. 2023 या आर्थिक वर्षामध्ये भारताने पॉवर प्लांट्समध्ये वापरण्यासाठी सुमारे 59 दशलक्ष टन कोळसा आयात करणे अपेक्षित आहे. तसेच जूनसाठी 4.8- 5 दशलक्ष टनाच्या दरम्यान पुरवठादारकडून कोळसा आयातीची शक्यता आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला सरकारी कोळसा कंपनी कोल इंडियाने आर्थिक वर्ष 2023 च्या जुलै-सप्टेंबरसाठी 2.42 दशलक्ष टन आयात करण्यासाठी निविदा काढली आहे. एकूणच, जुलै 2023 पर्यंत कोल इंडियाला सुमारे 12 दशलक्ष टन कोळसा आयात करावा लागेल.

दरम्यान हारगा बटूबारा एकुआन म्हणजेच इंडोनेशियन कोळशाच्या किंमतीमध्ये 2022 च्या सुरूवातीपासून वाढ होत आहे. जानेवारीमध्ये कोळशाच्या किमती 158.50 डॉलर प्रति टन होत्या. तर फेब्रुवारीमध्ये त्यामध्ये वाढ होऊन 188.38 डॉलर वर पोहचल्या. त्यानंतर मार्चमध्ये 203.69 डॉलर प्रति टनपर्यंत वाढल्या. पुढे एप्रिल महिन्यात त्या 288.40 डॉलर वर पोहचल्या. आणि नंतर मे महिन्यामध्ये 275.64 डॉलर प्रति टन झाल्या.

तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये वाढत्या गॅसच्या किंमतीमुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया वीजनिर्मितीसाठी कोळशाचा वापर करू शकते. कारण कोळसा स्वस्त पडतो, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. दरम्यान, चीन, भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया जगातील सर्वाधिक कोळसा आयात करणारे देश आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com