Chana Procurement : राज्यात साडे सतरा लाख क्विंटल हरभरा खरेदी

Chana Market : राज्यात गेल्या १५ मार्चपासून हरभऱ्याची हमीभावाने खरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे साडे सतरा लाख क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी झाला आहे.
Chana Procurement
Chana ProcurementAgrowon

Chana Market Update Akola : राज्यात गेल्या १५ मार्चपासून हरभऱ्याची हमीभावाने खरेदी (Chana MSP Procurement) केली जात आहे. आतापर्यंत सुमारे साडे सतरा लाख क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी (Chana Procurement) झाला आहे.

मात्र, अद्याप या खरेदीचे चुकारे सुरु झालेले नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत. हरभरा खरेदीनंतर गोदामात त्याची साठवणूक झाल्यानंतर चुकाऱ्यांसाठीची पुढील प्रक्रिया सुरु होते. येत्या आठवड्यात चुकारे मिळणे सुरु होतील, अशी शक्यता पणन विभागातील अधिकाऱ्याने वर्तविली.

राज्यातील बाजारात हरभऱ्याला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांनी या वेळी शासकीय केंद्रावर हरभरा विक्रीला पसंती दिली आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, महाएफपीसी, पृथाशक्ती एफपीसी, वॅपको, महाकिसान व्ही, महाकिसान संघ, महा स्वराज्य अशा खरेदीदारांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे.

Chana Procurement
Chana Procurement : राज्यात हरभरा खरेदी ६ लाख क्विंटलवर

या सर्व एजन्सींची राज्यात सुमारे ६१० केंद्रे कार्यान्वित आहेत. या केंद्रांवर कुठे १४ तर कुठे १५ मार्चपासून खरेदी सुरु झाली. आतापर्यंत १७ लाख ४४ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

जवळपास ८६ हजार ६६२ शेतकऱ्यांचा हा माल आहे. शासकीय हमीभाव ५ हजार ३३५ रुपये आहे. बाजार समित्यांत हरभऱ्याला दर ४५०० रुपयांपर्यंत मिळत असल्याने शेतकरी या खरेदी केंद्रांवर गर्दी करीत आहेत.

सध्या खरेदी प्रक्रिया वेगाने सुरु असून त्याच पद्धतीने खरेदी केलेला माल गोदामात जमा केला जात आहे. या ठिकाणी माल ठेवल्यानंतर तयार होणारी पावती ही चुकाऱ्यांसाठी महत्त्वाची राहते.

याच पावतीच्या आधारे ‘नाफेड’मार्फत चुकारे दिले जातात. हंगामाची सुरुवात तसेच मार्च एण्डमुळे आतापर्यंत चुकारे रखडले होते. मात्र, येत्या आठवड्यापासून चुकारे मिळू लागतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Chana Procurement
Chana Procurement : हरभरा खरेदी नोंदणीमध्ये ऑनलाइन पेऱ्याची अडचण

कोट्यवधींचे चुकारे रखडले

‘नाफेड’च्या यंदाच्या खरेदीत अनेक अडचणी आहेत. अनेक ठिकाणी मध्यंतरी बारदाना उपलब्ध नसल्याने अडचणी आल्या. शिवाय अधूनमधून पावसाचे ढगही या खरेदीत बाधा बनत आहेत. यंदा हरभरा उत्पादक शासकीय खरेदीवर अवलंबून आहे.

त्यातच चुकारे अद्यापही सुरु झालेले नसल्याने विक्री करणारे शेतकरी सातत्याने याची विचारणा संबंधित केंद्र चालकांकडे करीत आहेत. साडे सतरा लाख क्विंटल हरभऱ्याचे कोट्यवधींचे चुकारे रखडले आहेत.

खरेदीविषयी थोडक्यात...

कार्यरत केंद्र...६१०

नोंदणीकृत शेतकरी...५ लाख ८२ हजार ८२८

खरेदी झालेला हरभरा...१७ लाख ४४ हजार ८७ (क्विंटल)

विक्री करणारे शेतकरी...८६ हजार ६६२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com