Millet : खरिपातील बाजरीच्या क्षेत्रात झपाट्याने घट

नगर जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टरवर बाजरी पेरली जायची. यंदा बाजरीची नगर जिल्ह्यात अवघ्या ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Millet
MilletAgrowon

नगर ः खरिपात (Kharif Season) राज्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या बाजरीच्या क्षेत्रात (Millet Acreage) कमालाची घट होत चालली आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टरवर बाजरी पेरली (Millet Sowing) जायची. यंदा बाजरीची नगर जिल्ह्यात अवघ्या ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाच वर्षांत निम्म्याने क्षेत्रात घट झाली आहे. राज्यातही बाजरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे.

Millet
Pulses : कडधान्यांमधील तेजी कितपत टिकाऊ ?

राज्यातील नगर, मराठवाडा, सोलापूर, विदर्भातील काही भागांत खरिपात बाजरी पेरली जात होती. राज्यात सर्वाधिक अडीच ते तीन लाखापर्यंत हेक्टर क्षेत्र हे एकट्या नगर जिल्ह्यात असायचे. मात्र अलीकडच्या पाच ते सात वर्षांत बाजरी पिकवण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करू लागले आहेत. राज्यात साधारण आठ ते दहा लाख हेक्टरवर घेतले जाणारे बाजरीचे पीक आता पाच लाख हेक्टरच्या आत आले आहे.

Millet
Sugar Mills: बहुतांश कारखान्यांकडून साखर उतारा प्रमाणपत्रे सादर

नगर जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी २ लाख हेक्टरवर बाजरी पेरली. यंदा ८४ हजार हेक्टरवर पेरली. म्हणजे पाच वर्षांचा विचार करता निम्म्याने हेक्टर क्षेत्र घटले. बाजरीच्या क्षेत्राएवजी सोयाबीन, कांदा, तुरीसारख्या पिकांची पेरणी होऊ लागली असल्याचे ‘कृषी’तील जाणकार सांगत आहेत.

दैनंदिन आहारात बहुतांश लोक बाजरीचा वापर करत असतानाही बाजारात बाजरीला आतापर्यंत कधीच प्रतिक्विंटल अडीच हजाराच्या पुढे दर मिळाला नाही. आजही नगरच्या बाजारात बाजरीला साधारणपणे २ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. शेती मशागत, उत्पादन खर्च वाढत असताना फारसे उत्पादन निघत नाही. त्यातही पुरेसा दर मिळत नाही. मागील दोन वर्षांत एन काढणीच्या काळात पावसाने नुकसान झाले. सरकारकडूनही बाजरी उत्पादकांची फारसी दखल घेतली जात नसल्याने बाजरीचे क्षेत्र घटत असल्याचे सांगितले जात आहेत.

नगर जिल्ह्यातील बाजरीचे खरीप पेरणी क्षेत्र

२०१६-१७...१ लाख ९८ हजार १८

२०१७-१८...१ लाख ३१ हजार ६३९

२०१८-१९...१ लाख १३ हजार ७१३

२०१९-२०...१ लाख ६० हजार २४३

२०२०-२१...१ लाख ५२ हजार ६७६

२०२१-२०२२...८४ हजार ८०५

क्षेत्र घटीबाबत गांभीर्य नाही

नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत खरिपात बाजरीचे क्षेत्र अधिक होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत बाजरीचे क्षेत्र झपाट्याने घटत आहे. दैनंदिन आहारात बहुतांश लोक बाजरीचा समावेश करतात. मात्र बाजारात बाजरीला पुरेसा दर नाही. बाजरीची काढणी साधारणपणे दसरा-दिवळी या काळात होते. ज्या भागात बाजरीचे पीक घेतले जाते त्या भागात एन काढणीच्या काळात परतीचा पाऊस जोरात असते. गेल्या पाच वर्षांत बाजरीचे पूर्णतः नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. अशा अनेक कारणाने बाजरीचे क्षेत्र घटत असले तरी सर्वाधिक क्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यातही बाजरीच्या घटता क्षेत्राबाबत कृषी विभागाला फारसे गांभीर्य नाही, असेच दिसतेय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com