Mango Canning : कॅनिंगला आंब्याचा तुटवडा; दर प्रतिकिलो ६० रुपयांवर

Mango Processing Business : बदलत्या वातावरणाचा फटका बसलेल्या हापूसचे यावर्षी उत्पादनाच्या ३० टक्के उत्पादन मिळाले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंबा काहीअंशी बागायतदारांना मिळाला.
Mango
MangoAgrowon

Mango Canning : जिल्ह्यात कॅनिंगकरिता हापूस आंब्याचा तुटवडा (Mango Shortage) जाणवण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आंबा प्रक्रिया (Mango Processibg) उद्योजक धास्तावले आहेत. आंब्याच्या तुटवड्यामुळे आंब्याचा दरदेखील प्रतिकिलो ६० रुपयांवर पोहोचला आहे. अलीकडील काही वर्षांतील हा सर्वाधिक दर असल्याचे सांगितले जात आहे.

बदलत्या वातावरणाचा फटका बसलेल्या हापूसचे यावर्षी उत्पादनाच्या ३० टक्के उत्पादन मिळाले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंबा काहीअंशी बागायतदारांना मिळाला. परंतु तिसऱ्या टप्प्यातील अपेक्षित उत्पादन आले नाही. त्यामुळे एप्रिल अखेरपासून आंब्याची आवक घटली. आंब्याची आवकच नसल्याने प्रतिडझन ८०० ते ९०० रुपये दर टिकून आहे.

Mango
Hapus Mango Market : हापूसच्या पाच डझनाच्या पेटीला साडेतीन हजार रुपये

दरवर्षी अंतिम टप्प्यातील आंबा हा कॅनिंगसाठी दिला जातो. लहानमोठा सर्वच आंबा कॅनिंगमध्ये घेतला जात असल्याने बागायतदार आंबा कॅनिंगसाठी द्यायचे. आतापर्यंत कॅनिंगला प्रतिकिलो २५ ते ३० रुपये दर देऊन प्रक्रिया उद्योजक आंबा खरेदी करीत होते. परंतु यावर्षी कॅनिंगला आंबा मिळेनासा झाला आहे.

Mango
Mango Pulp Rate : आमरसाच्या दरात किलोला ६० ते ७० रुपये वाढीचा अंदाज

मे च्या पहिल्या आठवड्यात आंब्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कॅनिंगच्या आंब्याचा दरदेखील प्रतिकिलो ६० रुपयांवर पोहोचला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला प्रतिदिन १०० ते १५० टन आंबा प्रक्रिया उद्योगाला जात होता.

यंदा मात्र अजूनही सुमारे २० ते ३० टन आंबाच प्रक्रिया उद्योगाला जात आहे. दरम्यान आंब्याच्या तुडवड्यामुळे कॅनिंग व्यवसाय संकटात सापडण्याची शक्यता आहे.

आंबा उत्पादनात झालेली घट आणि फळबाजारात आंब्याला मिळणारा चांगला दर यामुळे कॅनिंगसाठी आंबा येत नाही. हंगामाच्या सुरुवातीला आंब्याला प्रतिकिलो ४८ रुपये होता तो आता ६० रुपयांवर गेला आहे. कॅनिंगकरिता आंबा मिळत नसल्यामुळे प्रक्रिया उद्योग संकटात येण्याची शक्यता आहे.
- मंगेश वेतकर, कॅनिंग व्यावसायिक, पडेल
आंबा उत्पादन कमी असून असलेल्या आंब्याला ग्राहकांकडून अधिक दर मिळत आहे. त्यामुळे अधिकतर बागायतदार फळबाजारातच आंबा विक्री करतात. आंबा कमी असल्यामुळे कॅनिंगचे दर वाढले आहेत. परंतु आंबा नसल्यामुळे कॅनिंगला आंबा देता येत नाही.
- प्रशांत शिंदे, आंबा बागायतदार, कातवण (देवगड)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com