Vegetable Rate : पुण्यात भाज्यांच्या दरात हलकी तफावत

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २७) मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, घेवड्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे.
Vegetable Market Rate
Vegetable Market RateAgrowon

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Pune APMC) रविवारी (ता. २७) मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक (Fruit Vegetable Arrival) वाढली. त्यामुळे कांदा (Onion), टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, घेवड्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच आवक-जावक कायम असल्याने इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव स्थिर (Vegetable Rate) होते.

बाजारात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून साधारणतः १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा २ टेम्पो, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो घेवडा, पंजाब, मध्य प्रदेशातून १६ ते १७ टेम्पो मटार, कर्नाटकातून तोतापुरी कैरी १५० टेम्पो, बंगळूर येथून २ टेम्पो आले, मध्य प्रदेशातून लसणाची १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली.

Vegetable Market Rate
Vegetable oil : वनस्पतिजन्य तेलाची अनोखी दुनिया

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १४०० ते १५०० पोती, टोमॅटो १२ ते १३ हजार क्रेट, गवार ७ ते ८ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, कांदा ७० ट्रक, आग्रा, इंदूर आणि पुणे विभागातून बटाटा ३० ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा : १००-१५०, बटाटा : १७०-२२०. लसूण : १५०-४५०, आले सातारी : १५०-४५०, भेंडी : २००- ४००, गवार : गावरान व सुरती ४००-६००, टोमॅटो : ६०-८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी १४०-१८०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१८०- २००, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : ६०-८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : २००-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १२००-१४००, गाजर : २००-३००, वालवर : ३००-३५०, बीट : २८०-३००, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१२०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : परराज्य: ५००-५५०, पावटा : ५००- ७००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०- १००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

Vegetable Market Rate
Vegetable Production : दुर्गम भागात कुपोषणमुक्‍तीसाठी भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन

पालेभाज्या

मेथी, शेपू, पुदिना, मुळे, चुका, पालक स्वस्त

रविवारी बाजारात कोथिंबिरीची १ लाख २५ हजार गड्डी व मेथीची ८० हजार जुडी आवक झाली. रविवारी घाऊक बाजारात मेथीच्या भावात गेल्या आठवड्यापेक्षा गड्डीमागे ६ रुपयांची घट झाली. तसेच शेपूच्या भावात ४ रुपये, चुका ४ रुपये, पुदीना २ रुपये, मुळे १ रुपया, पालकच्या भावात १ रुपयाने घट झाली होती. केवळ करडईच्या भावात गड्डीमागे एक रुपयाने भाववाढ झाली असून, इतर सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ६००-१०००, शेपू : ४००-७००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ५००- ७००, पुदीना : ३००-६००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ६००-१२००.

फळबाजार

मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात ढगाळ वातावरणामुळे बोरांची आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणी नसल्याने बोरांच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. तर, लिंबाच्या १५ किलोच्या गोणीमागे १०० ते १५० रुपयांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कायम असल्याने त्यांचे भावही टिकून आहेत.

रविवारी (दि. २७) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ५ ट्रक, संत्री १५ ते २० टन, मोसंबी ६० ते ७० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० गोणी, पेरू १००० ते १२०० के्रटस्, कलिंगड ४ ते ५ गाड्या, खरबूज ६ ते ७ गाड्या, द्राक्षे ३ ते ३.५ टन, बोरे १००० पोती तर सीताफळाची १५ ते २० टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रति गोणी) : १५०-३००, अननस : १००-४५०, मोसंबी : (३ डझन) : २५०-४२०, (४ डझन) : १२०-२५०, संत्रा : (१० किलो) : १५०-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ६०-२००, गणेश : २०-५०, आरक्त ३५-१३०. कलिंगड : १५-२५, खरबूज : २०-३५, पपई : ५-२५, पेरू (२० किलो) : २००-३५०, चिक्कू (१० किलो) : १००-५००, सीताफळ : १०-१८०, बोरे (१० किलो) : चेकनट : ५००-६००, उमराण : १००-१३०, चमेली : २००-२३०, चण्यामण्या : ३५०-४००.

फुलबाजार

लग्नसराई सुरू असल्याने बाजारात कटफ्लॉवरला मागणी वाढली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : ४०-६०, अॅस्टर (४ जुड्या) ः १०-१६, सुटा ८०-१५०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-४०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ४०-१२०, डच गुलाब (२० नग) : ८०-३५०, जरबेरा : ४०-६०, कार्नेशियन : २००-२५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लाडिओ (१० काड्या) : ६०-१२०, चमेली : ४००-६००, जिप्सोफिला : ३००-५००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com