Chana Procurement : हरभरा नोंदणीकृत आठ हजारांपैकी केवळ ५२ शेतकऱ्यांना एसएमएस

जिल्ह्यात हमीभावाने हरभरा विक्रीसाठी सध्या ८ हजार ९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर बोलावले आहे. त्यांना मार्केटिंग कार्यालयाच्या वतीने एसएमएस पाठविला जातो.
Harbhara Market
Harbhara MarketAgrowon

Chana Market Update वर्धा ः जिल्ह्यात हमीभावाने हरभरा विक्रीसाठी (Chana Sale) सध्या ८ हजार ९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरेदी (Chana Procurement) केंद्रावर बोलावले आहे. त्यांना मार्केटिंग कार्यालयाच्या वतीने एसएमएस पाठविला जातो.

जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या मोठी असताना असे एसएमएस केवळ ५२ शेतकऱ्यांना पाठविण्यात आले आहेत.

त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना एसएमएसची प्रतीक्षा लागून आहे. त्यातच पावसामुळे खरेदीला विलंब होत असल्याने या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.

बाजारात हरभरा दर दबावात असल्याच्या परिणामी हमीभावाने याच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

त्याच्याच परिणामी ‘नाफेड’ला हरभरा विक्रीसाठी आजवर तब्बल आठ हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Harbhara Market
Chana Procurement : परभणीत हमीभावाने हरभरा खरेदी दोन केंद्रांवर सुरू

शासनाने नोंदणीकरीता शुक्रवार (ता. ३१) पर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.

त्यातच मंगळवारी (ता. १४) पासून हमीभावाने खरेदी सुरू होणार असे सांगितले जात होते. मात्र ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्‍यता या कारणामुळे खरेदीला विलंब होत असल्याची चर्चा आहे.

खुल्या बाजारात हरभऱ्याचे व्यवहार ४३०० ते ४६३८ रुपये क्‍विंटलप्रमाणे होत आहेत. दुसरीकडे शासनाने हरभऱ्याकरीता ५३३५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे.

खुल्या बाजारातील दरापेक्षा हमीभावात ७०० ते ८०० रुपयांची तफावत आहे. त्याच्याच परिणामी हमीभावाने आपला हरभरा विकल्या जावा याकरिता शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

Harbhara Market
Chana Market : हरभरा दरात सुधारणा होईल की नाही?

शासनाने हमीभावाने हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांना खरेदी विक्री संघाकडे नोंदणीचे आवाहन केले आहे.

त्यामुळे अशा खरेदीदार संस्थांसमोर नोंदणीकरीता रांगा लागल्या आहेत. गेल्या हंगामात उशिरा नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला नव्हता. परिणामी, त्यांना नुकसान सोसावे लागले.

यंदाही तशीच परिस्थिती ओढवू नये याकरिता खबरदारी म्हणून शेतकरी नोंदणीसाठी धडपडत आहेत. शासकीय खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी बंदचा निर्णय घेतला जातो.

ढगाळ वातावरणाने चिंता

विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तसे संकेतही दिसत आहे. यामुळे खरेदी केंद्रे सुरू करण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

असे असले तरी घरी जागा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे खरेदी तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com