Gold Market : सोने-चांदीच्या दरात नरमाई

Gold Market News : सोने-चांदीचे वधारणारे दर गुरुवारी (ता. १८) काहीसे नरमले. सोन्याचा दर ६०,०७४ रुपये प्रतितोळा झाला. तसेच चांदीचा दर ७२,४३० रुपये प्रतिकिलो झाला.
Gold Market Rate
Gold Market RateAgrowon

Jalgaon News : सोने-चांदीचे वधारणारे दर गुरुवारी (ता. १८) काहीसे नरमले. सोन्याचा दर ६०,०७४ रुपये प्रतितोळा झाला. तसेच चांदीचा दर ७२,४३० रुपये प्रतिकिलो झाला.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सकाळच्या सत्रात सोन्याच्या कितमीत घसरण झालेली दिसून आली. चांदीदेखील काहीशी नरमली. सोने दरात सातत्याने चढउतार होत आहेत. गेल्या पंधरवाड्यात मात्र दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतली नाही.

ऐन लग्नसराईत दर वधारल्याने ग्राहकांच्या खिशावर बोजा वाढला होता. पण या पडझडीचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवारी सकाळी १०.३० पर्यंत सोन्याचा दर ७० रुपयांनी घसरला. यानुसार सोन्याचा दर प्रतितोळे ६०,०७४ रुपयांवर आला. गुरुवारी चांदीच्या दरात २३० रुपये एवढी घसरण झाली. चांदीचा दर ७२,४३० रुपये प्रतिकिलो झाला.

Gold Market Rate
Gold Rate : सोन्याची झळाळी वाढली ; जळगावात प्रतितोळा दर विक्रमी ६३ हजारांच्या पार

जळगावातील सराफा बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,९०० रुपये (विनाजीएसटी) प्रतितोळा एवढा आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,००० रुपये (विनाजीएसटी) राहिला. बुधवारी (ता. १७) सकाळी सोन्याचा दर ६१,५०० रुपये प्रतितोळा होता.

Gold Market Rate
Gold Rate : सोने-चांदीच्या दरात वाढ

त्यात एका तोळ्यामागे ५०० रुपयांची घसरण दिसत आहे. तर चांदीचा दर ७२,५०० रुपये प्रतिकिलो (विनाजीएसटी) आहे. बुधवारी सकाळी चांदीचा दर ७३००० रुपये प्रतिकिलो होता. चांदी दरातदेखील एक किलोमागे ५०० रुपये एवढी घट झाली.

पूर्वी गाठलेल्या दरांच्या उच्चांकी पातळीपासून चांदीचा दर सुमारे ४८०० ते ५००० रुपयांनी कमी झाला आहे. सोनेदेखील दरांच्या उच्चांकी पातळीपासून १००० ते १२०० रुपयांनी एक तोळ्यामागे घसरले आहे.

पण पुढे सोन्याचा दर ६५ हजार रुपये प्रतितोळे इतका टप्पा गाठू शकतो. चांदीदेखील लवकरच ९० हजार रुपये प्रतिकिलो अशी दरपातळी गाठेल, असा अंदाज जळगाव येथील सराफा बाजारातील विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com