Onion Procurement : ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी

Onion Market Update : गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

Kanda Market : गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी सुरू केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २०) डॉ. पवार यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी माहिती दिली. यंदा तीन लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत टिकवण क्षमता कमी असलेल्या लाल कांद्याची ‘नाफेड’मार्फत प्रथमच खरेदी करण्यात आली आहे.

Onion Market
Onion Market : लिलावात स्पर्धा नसल्यानेच कांदा दराला फटका

आता उन्हाळ कांदा सुरू झाला असून, नाफेडमार्फत उन्हाळ कांदा खरेदीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच खरेदी सुरू होणार आहे. यामुळे बाजार समिती स्पर्धा निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी मदत होईल.

‘नाफेड’ची ओळख ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाली आहे. चाळीस हजार टनांपर्यंत उन्हाळ कांद्याची खरेदी केली जात होती. गेल्या वर्षी अडीच लाख टन खरेदी झाली होती. यंदा तीन लाख टन खरेदी केली जाणार आहे.

नाफेडबरोबर नाफेडच्या सब एजन्सी शेतकरी प्रोड्यूसर कंपनीही बाजार समितीतून कांद्याची खरेदी. करतील यासाठी प्रयत्न केले जाणार. आहेत असेही मंत्री डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

Onion Market
Onion Procurement : नाफेडची प्रत्यक्ष कांदा खरेदी का सुरू होत नाही?

‘त्या’ खरेदीची रक्कम लवकरच

दोन महिन्यांपूर्वी ‘नाफेड’मार्फत लाल कांद्याची खरेदी करण्यात आली होती, पण अद्यापही लाल कांद्याचे पैसे अदा करण्यात आलेले नाहीत, पण कागदपत्रांची संबंधित नाफेडच्या सब एजन्सीकडून पूर्तता झाल्यानंतर लवकरच पैसे अदा केले जातील, असा विश्‍वास माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला.

बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुनील डाचके, कांदा निर्यातदार व्यापारी मनोज जैन, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, माजी प. स. सदस्य संजय शेवाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com