Soybean Rate : हिंगोली बाजार समितीत सोयाबीन ४६०० ते ५००० रुपये क्विंटल

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात (भुसार मार्केट) गेल्या आठवड्यापासून यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Hingoli APMC) धान्य बाजारात (भुसार मार्केट) गेल्या आठवड्यापासून यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सुरू झाली आहे. शनिवारी (ता. १) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ५००० रुपये तर सरासरी ४८०० रुपये दर (Soybean Rate) मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?

मंगळवारी (ता. २७) ते शनिवार (ता. १) या कालावधीत हिंगोली येथील धान्य बाजारात सोयाबीनची २१८५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल सरासरी ४७०७ ते ४८०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ३०) सोयाबीनची ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ५००० रुपये दर सरासरी ४८०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २९) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ५०११ रुपये तर सरासरी ४८०५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २८) सोयाबीनची ४८५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४८९६ रुपये तर सरासरी ४६९८ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २७) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४९१५ रुपये तर सरासरी ४७०७ रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com