Soybean Rate : कळमन्यात सोयाबीन आवक मंदावली

सोयाबीन दरात येत्या काळात आणखी तेजीच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीऐवजी त्याच्या तारणावर भर दिला जात आहे.
soybean rate
soybean rate agrowon

नागपूर ः सोयाबीन दरात (Soybean Rate) येत्या काळात आणखी तेजीच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीऐवजी त्याच्या तारणावर भर दिला जात आहे. त्यामुळेच बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली असून ती गेल्या आठवड्याच्या ३ हजार क्‍विंटलवरुन १४०० क्‍विंटलवर आली आहे. सोयाबीनचे व्यवहार ४६०० ते ५५०० रुपयांनी होत आहेत.

soybean rate
Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय ?| ॲग्रोवन

केंद्र सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावल्यामुळे बाजारात सोयाबीन दरात घसरण झाली होती. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला. केंद्राच्या या धोरणाचा विरोध होऊ लागल्याने अखेरीस स्टॉक लिमिटचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर बाजारात सोयाबीन दरात तेजी अनुभवण्यात येत आहे. सरासरी ४७०० ते ५५०० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. येत्या काळात हे दर आणखी वधारण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीऐवजी स्टॉकवर भर दिला आहे.

बहुतांश शेतकरी सोयाबीन तारण ठेवत असल्याचे चित्र विदर्भात सर्वदूर आहे. कारंजा (जि. वाशीम) बाजार समितीत गेल्या काही महिन्यातच सुमारे २० हजार क्‍विंटल सोयाबीन तारण ठेवण्यात आले आहे. हमीभावाच्या ७५ टक्‍के रक्‍कम या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते व त्यावर सहा टक्‍के व्याज आकारले जाते. कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोयाबीन आवक निम्म्यावर आली असून ती अवघी १४०० क्‍विंटलची आहे.

soybean rate
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

हरभरा आवक ५० क्‍विंटल तर दर ४२०० ते ४४०० असे आहेत. गव्हाचे व्यवहार २५७० ते २७७० प्रमाणे होत असून आवक १२८ क्‍विंटलची आहे. तांदूळ आवक तीन क्‍विंटल आणि दर २७० ते ३००० रुपये होते. मुंगाला ५००० ते ५२०० असा दर मिळाला आणि आवक ९ क्‍विंटलची होती. बाजारात केळीचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. केळीची आवक ८ क्‍विंटल आणि दर ४५० ते ५५० असे होते.

डाळिंबाला २००० ते १२००० रुपये असा दर मिळत आवक ६३ क्‍विंटलची झाली. बटाट्याची आवक वाढती असून ती गेल्या आठवड्याच्या १७५० क्‍विंटलवरुन ३०८८ क्‍विंटलवर पोचली. बटाट्याला १५०० ते २००० रुपये असा दर मिळत आहे. कांदा आवक १००० क्‍विंटल आणि १५०० ते २५०० याप्रमाणे होते.

soybean rate
Crop Cover : क्रॉप कव्हरचा वापर

लसूण व्यवहार ५०० ते ४५०० प्रमाणे झाले आणि आवक १४०० क्‍विंटल इतकी होती. आले आवक १०८० क्‍विंटलची तर दर ३२०० ते ४२०० याप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले. वाळलेल्या मिरची दरातील तेजी कायम आहे. १३८७ क्‍विंटलची आवक असलेल्या मिरचीचे व्यवहार १२००० ते २०००० रुपये क्‍विंटलने होत आहेत. टोमॅटोला १२०० ते १५०० रुपयांचा दर मिळत आवक ५०० क्‍विंटलची होती. वाटाणा शेंग देखील बाजारात दाखल झाली आहे.

संत्रा दर स्थिर

बाजारात संत्रा फळांची आवक नियमीत आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांची आवक ६०० क्‍विंटल होती. त्यावेळी फळाला २२०० ते २५०० असा दर मिळाला. या आठवड्यात आवक ४०० क्‍विंटल आणि दर २२०० ते २६०० असे राहिले. मोसंबीची आवक ७०० क्‍विंटल आणि दर २४०० ते ३८०० प्रमाणे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com