Soybean Rate : सोयापेंड निर्यातवाढीचा शेतकऱ्यांना फायदा

सोयाबीन हंगाम एक महिना उशिरा होऊनही पहिल्या महिन्यातील सोयापेंड निर्यातीत भरीव वाढ झाली आहे. ही चांगली सुरुवात आहे. पुढील तीन-चार महिने निर्यातीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत एकंदर जागतिक बाजारातील घडामोडींतून मिळत आहेत.
soybeans
soybeansAgrowon

मा गील आठवड्यात आपण कापूस बाजाराचा (Cotton Market) आढावा घेतला होता. मंदीच्या काळात अन्न आणि वस्त्र या दोन प्रमुख गरजांपैकी एक स्वीकारायची तर अन्नाला प्राधान्य दिले जाते, या न्यायाने सोयाबीन (soybeans) आणि कापूस (Cotton) यापैकी सोयाबीनमधील मागणी तुलनेने केव्हाही अधिक राहते. म्हणून निदान पुढील दीड-दोन महिन्यांचा विचार करता जगातील मंदीसदृश वातावरणात कापसापेक्षा सोयाबीनची साठवणूक करावी, तर कापसाची प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे मत व्यक्त केले होते.

त्यानंतर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) २०२२-२३ वर्षासाठी कापसाचा ताळेबंद प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये कापसाची मागणी मागील हंगामातील ३१८ लाख गाठींवरून ३०० लाख गाठींवर घसरेल असे भाकीत वर्तवले आहे. त्याचप्रमाणे भारतातील कापूस निर्यात देखील ४३ लाख गाठींवरून ३० लाख गाठीवर येईल असे म्हटले आहे. (अर्थात, सीएआयच्या अंदाजावर टीकाही झाली आहे.)

soybeans
Rabi Irrigation : रब्बी, उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची चिंता मिटली

मागील लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे वस्त्र-प्रावरणे कंपन्यांचे त्रैमासिक आर्थिक अहवाल निराशाजनक असून, एका मोठ्या कंपनीच्या मालकाने आपल्या मालकीच्या शेअर्समधील अडीज टक्के वाटा खुल्या बाजारात विकणे हे शेअर बाजाराच्या दृष्टीने नकारात्मक म्हटले जाते. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार सुतिधागा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सध्या ४०-६० टक्के क्षमतेने काम चालले आहे. म्हणजेच कापूस उद्योगामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ही सर्व माहिती आणि आकडेवारी लेखाशी सुसंगत दिसून येत आहेच.

तसेच दुसऱ्या एका अहवालाप्रमाणे आशियायी आणि काही पाश्‍चिमात्य देशांमध्ये कापूस साठवणूक धोरणात झालेले बदलही कापसाच्या मागणीवर विपरीत परिणाम करीत आहेत. म्हणजे कोरोना काळामध्ये वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे अनेक कंपन्या आपल्याजवळ ४०-६० दिवसांच्या गरजेइतपत कापसाचे साठे करून ठेवत असत.

त्यामुळे मागणीमध्ये प्रचंड वाढ होऊन मागील हंगामात कापूस १२,००० रुपये प्रति क्विंटल या विक्रमी पातळीवर गेला होता. परंतु आता हे साठेधोरण आता २०-२५ दिवसांवर आणले जात असल्यामुळे आणि यूरोपमध्ये कपड्यांच्या मागणीत घट झाल्यामुळे कापसासाठी पुढील कालावधी परीक्षेचा राहील, असेही म्हटले जात आहे. शेवटी कमोडिटी बाजार हा गहन विषय असला तरी जे दिसतंय ते असे आहे.

soybeans
Onion Cultivation : धुळ्यातील कांदा लागवड कमीच

तर महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनमध्ये परिस्थिती उत्पादकांसाठी अनुकूल होत असून, सोयाबीनची साठवणूक बऱ्यापैकी फायदेशीर राहील असे मागील आठवड्यातील लेखात म्हटले होते. सोयपेंड (सोयामिल) निर्यात वाढण्याच्या अपेक्षेबरोबरच जागतिक बाजारातील अनुकूल घटक याविषयी माहिती त्यात दिली होती.

मागील आठवड्यामध्ये द सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) पशुखाद्य (खल) निर्यातीची मासिक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात असे दिसून येईल, की ऑक्टोबर महिन्यात सोयापेंड निर्यात सप्टेंबरच्या तुलनेत चक्क तिप्पट होऊन ती ४०,००० टनांच्या पार गेली आहे. तर ऑक्टोबर २०२१ च्या तुलनेत ती १७६ टक्के अधिक आहे.

या वर्षी सोयाबीन हंगाम एक महिना उशिरा होऊनही पहिल्या महिन्यातील निर्यात एवढी वाढली आहे. ही चांगली सुरुवात आहे. पुढील तीन-चार महिने निर्यातीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत एकंदर जागतिक बाजारातील घडामोडींतून मिळत आहेत.

soybeans
Sugar Price : साखरेच्या दरावर परिणाम होणार का ? | ॲग्रोवन

एसईएच्या म्हणण्यानुसार तर सोयापेंड निर्यात येत्या काळात वेगाने वाढण्याची शक्यता आहे. जीएम सोयाबीन विरहित सोयापेंडीला काही युरोपियन देश आणि पूर्वेकडील देशांची पसंती वाढत असल्यामुळेदेखील भारतीय सोयपेंड पुढील काळात मोठ्या प्रमाणात निर्यात होईल. या वर्षी भारतात सोयाबीनचे उत्पादन आणि मागील शिल्लक मिळून १२५-१३० लाख टन सोयाबीन उपलब्ध असेल. पुढील वर्षासाठी पेरणीसाठी लागणारे बियाणे आणि साठे वजा जाता क्रशिंगसाठी राहणारी उपलब्धता १०० लाख टन तरी असेल.

यापासून ८०-८५ लाख टन सोयापेंड निर्माण होईल. देशांतर्गत मागणी साधारणपणे ६०-६५ लाख टन धरली तरी निदान अंदाजे २० लाख टन अतिरिक्त पेंड निर्यात करणे शक्य होईल. मागील वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये मोठ्या तेजीमुळे भारतीय सोयाबीन जागतिक बाजारात स्पर्धा करू शकले नाही. त्यामुळे सोयापेंड निर्यात २०२०-२१ मधील सुमारे १६ लाख टनांवरून घसरून ती ३ लाख ७५ हजार टनांवर घसरली.

सध्या अमेरिका, ब्राझील आणि अर्जेन्टिनामधील जीएम सोयापेंडेचे भाव पाहता तुलनेने भारतीय सोयाबीन आणि सोयामिल स्पर्धाक्षम आहेत. त्यामुळे आपली निर्यात वाढण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. ती पुढे अधिक अनुकूल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांतच निर्यात किमान ८-१० लाख टनांचा पल्ला सहज गाठेल असे वाटत आहे. एकंदर निर्यातीने या वर्षी परत २०२०-२१ चा टप्पा गाठला तर आश्‍चर्य वाटायला नको.

soybeans
Sugarcane farmers : शब्द न पाळल्याने ‘रासाका’ ची ऊस वाहने रोखली

अर्थात, नोव्हेंबरमधील सोयापेंडीच्या निर्यातीचे आकडे पाहून जर उत्पादकांनी आवक कृत्रिमपणे रोखून धरली गेली, तर किमती वाढल्यामुळे निर्यात-बाजारात आपल्याला स्पर्धा करणे कठीण होईल, ही शक्यताही जमेस धरणे आवश्यक आहे. तसेच मागील कालखंडामध्ये कमोडिटी बाजारात गोंधळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारी डॉलर इंडेक्समधील तेजी आता शमली आहे.

परंतु अमेरिकन व्याजदरवाढ पूर्वीच्याच दमाने चालू राहिल्यास एकंदर कमोडिटी मार्केटमध्ये येणारी करेक्शन सोयाबीनमध्येही आल्यास नवल वाटणार नाही. तरीही चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला आता प्रति क्विंटल ५४००-५५०० रुपयांचा दमदार आधार राहील, असे टेक्निकल चार्ट पाहणारी मंडळी म्हणत आहेत.

सध्याचा ५७००-५८०० हा भाव आठवडाभर राहिल्यास सोयाबीन उर्वरित नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पहिला पंधरवडा या कालावधीत ५४५० ते ६२५० या मोठ्या कक्षेत राहील असेही ही मंडळी आता सांगत आहेत. यामध्ये डिसेंबरमध्ये सोयाबीन वायदे बाजार चालू होण्याची शक्यता हा घटकही अंतर्भूत आहे. परंतु तो चालू झाला नाही तरी दरवाढीच्या कलात फारसा फरक पडणार नाही.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी

मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com