Soybean Rate : सोयाबीन साडेपाच हजारांवर

सोयाबीनच्या दरात आता वाढ होऊ लागली आहे. दर साडेपाच हजारांवर गेले आहेत. बाजारात सोयाबीनची आवकही वाढली आहे. दर काहीसे सुधारल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
soybean rate
soybean rate agrowon

यवतमाळ : सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) आता वाढ होऊ लागली आहे. दर साडेपाच हजारांवर गेले आहेत. बाजारात सोयाबीनची आवकही (Soybean Arrival) वाढली आहे. दर काहीसे सुधारल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

soybean rate
China Soybean : चीनची सोयाबीन आयात यंदा वाढणार

हंगामाच्या सुरूवातीला सोयाबीनच्या दरात घट झाली होती. आता हळूहळू दर सुधारत आहेत. पाच हजारांच्या आत असलेला दर साडेपाच हजारांवर पोहोचला आहे. गतवर्षी सोयाबीनला विक्रमी दर प्राप्त झाला होता. त्यामुळे यंदाही चांगले भाव मिळतील, या आशेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली.

soybean rate
Soybean Rate : लातूरला सोयाबीनची आवक आणि दरही चढेच

मात्र, सुरवातीला सोयाबीनचे दर पाच हजारांच्या खाली पोहोचल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. सोयाबीनला ४६०० ते ५००० रुपये असा दर मिळत होता. या दरामुळे सोयाबीन लागवडीचा खर्चही वसूल होतो की नाही, या विवंचनेत शेतकरी होते. मात्र, आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे. सोयाबीनला ५२०० ते ५५०० रुपये दर मिळू लागला आहे. शेतकरी अजूनही दर सुधारण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

आवक वाढायला सुरूवात

सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात सोयाबीनची आवक मंदावली होती. त्यात आता वाढ झाली आहे. दर सुधारल्याने आवक वाढल्याचा अंदाज आहे. सोयाबीनच्या दराने पाच हजारांचा टप्पा पार केल्याने थोडा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com