Marathwada Soybean Rate: मराठवाड्यातील कोणत्या बाजारात सोयाबीनचे दर सर्वाधिक राहिले?

मराठवाड्यातील प्रमुख लातूर, उदगीर, जालना, अहमदपूर आणि हिंगोली बाजारात सोयाबीनची आवक सर्वाधिक पाहायला मिळाली.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

Soybean Rate- राज्यातील बाजारात मागील आठवडाभर सोयाबीन आवक वाढली आहे. त्यामुळे दरही काहीसे नरमले आहेत.

शेतकरी गरजेनुसार सोयाबीन बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. आवक वाढल्यामुळे दर काहीसे दबावात आहेत.

राज्यातील प्रमुख बाजारात आठवडाभर सोयाबीन दर पातळी सरासरी ५ हजार ते ५ हजार २०० च्या दरम्यान राहिले.

मराठवाड्यात सोयाबीन आवक कशी राहिली?

मराठवाड्यातील प्रमुख लातूर, उदगीर, जालना, अहमदपूर आणि हिंगोली बाजारात सोयाबीनची आवक सर्वाधिक पाहायला मिळाली.

जालना बाजारात आठवड्याभरात ११ हजार ९८३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यापाठोपाठ ४ हजार ३०० क्विंटल सोयाबीन आवक झाली.

तसेच उदगीर आणि लातूर बाजारातही सोयाबीन आवक होळीनंतर कमी झालेली पाहायला मिळाली.

मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनची आवक कमीच राहिली.

Soybean Rate
Soybean, Tur Market : सरकार तूर, सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर; सरकारच्या निर्णयाने आयात वाढणार

मराठवाड्यातील कोणत्या बाजारात दर वाढले?

मराठवाड्यातील बाजारात मागील चालू आठवड्यात सोयाबीन दरपातळी सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० च्या दरम्यान होते.

होळीनंतर सोयाबीनची आवक वाढल्याने दर दबावात आल्याचे पाहायला मिळाले.

देशातही सोयाबीन दर याच दर पातळीभोवती फिरताना दिसत आहेत.

मराठवड्यातील चालू आठवड्यात उमरखेड बाजारात सर्वाधिक ५ हजार ३०० दर मिळाला.

तर अहमदपूर बाजारात चालू आठवड्यात सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार २०४ प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

लातूर बाजारात ५ हजार २३५ चा सर्वाधिक दर मिळाला. हिंगोली बाजारात ५ हजार ८० ते ५ हजार १०० प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. जालना बाजारात ५ हजार १५० सर्वाधिक दर मिळाला.

तर लातूर बाजारात ५ हजार ८० ते ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला मिळाला होता.

मराठवाड्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला चालू आठवड्यात सरासरी प्रतिक्विंटल दर ५ हजार ते ५ हजार ४५० च्या दरम्यान मिळाला.

सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढीसाठी अनुकूल स्थिती असूनही देशातील दर व्यापाऱ्यांनी दबावात ठेवले आहेत, असे जाणकारांचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com