Soybean Rate : देशातील सोयाबीन उत्पादन कमीच राहणार

देशात यंदा सोयाबीन पेरा स्थिर असूनही सोपानं देशातील सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढेल, असं म्हटलंय. पिकाची स्थिती चांगली असल्यानं सोयाबीनची उत्पादकता जास्त असल्याचाही दावा सोपानं केलाय.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः देशात यंदा सोयाबीन पेरा (Soybean Sowing) स्थिर असूनही सोपानं देशातील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) गेल्यावर्षीपेक्षा वाढेल, असं म्हटलंय. पिकाची स्थिती चांगली असल्यानं सोयाबीनची उत्पादकता (Soybean Productivity) जास्त असल्याचाही दावा सोपानं केलाय. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसतेय. जाणकार आणि शेतकऱ्यांना सोपाचा हा अंदाज मान्य नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसानं सोयाबीन पिकाला मोठा फटका (Soybean Crop Damage) बसत असल्याची माहिती शेतकरी आणि शेतीमाल बाजार अभ्यासकांनी दिली.

Soybean Rate
Soybean Rate : मका, हरभरा, सोयाबीनमध्ये घसरण

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं यंदा देशात १२० लाख टन सोयाबीन उत्पादन होईल असं म्हटलंय. सोपाच्या अंदाजाप्रमाणं मध्य प्रदेशातील पेरा यंदा जवळपास ५ लाख हेक्टरनं कमी होऊन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा एक लाख टनानं वाढून ५३ लाख टनांपर्यंत होईल. उत्पादकता ११२ किलोनं वाढून १०५१ किलोवर पोचल्याचंही सोपानं म्हटलंय.

Soybean Rate
Soybean Rate : ऐन सुगीत परतीच्या पावसाचा सोयाबीन, कपाशीला फटका

पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पावसानं नुकसान होतंय. त्यामुळं सोपाचा अंदाज चुकणार आहे. मागील काही दिवसांपासून मध्य सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पावसानं थैमान घातल्याचं इंदोर येथील शेतीमाल बाजार अभ्यासक गौरव कोचर यांनी सांगितलं.

Soybean Rate
Soybean Rate : देशात १२० लाख टन सोयाबीन उत्पादन

मध्य प्रदेशासोबतच महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यातही काही दिवस सतत पाऊस झाला. त्याचा पिकाला मोठा फटका बसला. तर आताही मराठवाडा आणि विदर्भ या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक विभागांमध्ये काढणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान होतंय. राजस्थानमध्येही पावसानं सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आलेत. पावसानं शेतात काढून ठेवलेल्या पिकाचंही नुकसान होतंय, असं उदयपूर येथील सोयाबीन उत्पादक सुरेंद्र वरडिया यांनी सांगितलं.

देशात यंदा सोयाबीनचा शिल्लक साठा जास्त असल्याचं सांगितलं जातं. देशात नेमकं किती सोयाबीन शिल्लक आहे, याची निश्चित माहिती नाही. काही जण १० ते १२ लाख टन तर काही जण १५ लाख लाख टनांपर्यंत सोयाबीन शिल्लक असल्याचं सांगत आहेत. त्यामुळं बाजारावर काहीसा दबाव दिसतो. मात्र हंगामाचा विचार केल्यास सोयाबीन जास्त दबावात येणार नाही, असं शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं.

एकूणच काय तर सोपानं यंदा देशात १२० लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला तरी तो खरा नसल्याचं स्पष्ट होतंय. पावसानं सोयाबीन पिकाचं नुकसान होत असल्यानं शेतकरी अडचणीत आलेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी जास्त दर मिळणं अपेक्षित आहे. मात्र बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता पुढील महिना, दोन महिने शेतकऱ्यांनी किमान ५ हजारांची दरपातळी लक्षात ठेऊन सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

देशात सोपाच्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादन कमीच राहील. सोयाबीन दरात लगेच फार मोठी तेजी दिसत नसली तरी सरासरी ५ हजार रुपये दर मिळू शकतो. मागील हंगामाप्रमाणं शेतकऱ्यांनी एकी दाखवल्यास दर निश्चितच सुधारतील.
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक
मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जैन, भोपाळ आदी विभागांमध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान वाढलंय. मध्य प्रदेशात २५ टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण झाली. तर जवळपास २५ टक्के पीक काढणी करून मळणीसाठी शेतात ठेवलंय. आणि ५० टक्के पीक शेतातच उभं आहे. या पिकाला पावसाचा मोठा फटका बसतोय. पावसामुळं उत्पादनात १० ते १५ टक्क्यांची घट येऊ शकते.
गौरव कोचर, शेतीमाल बाजार अभ्यासक, इंदोर, मध्य प्रदेश
राजस्थानमधील बहुतेक भागांमध्ये पीक आता काढणीच्या टप्प्यात आहे. मात्र ४ ऑक्टोबरपासून राज्यात जवळपास सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळं सोयाबीन पिकाचं नुकसान वाढलं. काढणीच्या काळातच पाऊस आल्यानं उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.
सुरेंद्र वरडिया, सोयाबीन उत्पादक, उदयपूर, राजस्थान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com