
Soybean Productivity परभणी ः परभणी -हिंगोली जिल्ह्यात २०२२ -२३ या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता (Soybean Productivity) परभणी जिल्ह्यात १५.६२ क्विंटल (एकरी ६.२४ क्विंटल) तर हिंगोली जिल्ह्यात १५.८८ क्विंटल (एकरी ६.३५ क्विंटल) आली आहे.
पीक कापणी प्रयोगाच्या (Crop Harvesting Experiment) निष्कर्षांवरून हे स्पष्ट झाले आहे. यंदा सोयाबीनची उत्पादकता पाच वर्षांतील सरासरीपेक्षा जास्त आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांतील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ३६ हजार ९६१ हेक्टर आणि सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी १०.८३ क्विंटल (एकरी ४.३२ क्विंटल) आहे.
गतवर्षीची (२०२१) सोयाबीनचे क्षेत्र २ लाख ४८ हजार ९७८ हेक्टर आणि उत्पादकता प्रतिहेक्टरी १०.५२ क्विंटल (एकरी ४.२ क्विंटल) होती.
२०२२ मध्ये सोयबीनची पेरणी २ लाख ५१ हजार ५०० हेक्टर आणि उत्पादकता प्रतिहेक्टरी ११ क्विंटल प्रस्तावित करण्यात आली होती.
प्रत्यक्षात २ लाख ६९ हजार ८०० हेक्टर पेरणी झाली. जिल्ह्यात सोयाबीनचे एकूण ६१२ पैकी ६१० पीक कापणी प्रयोग झाले. त्यानुसार जिल्ह्याची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता १५ क्विंटल ६२ किलो आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंगोली जिल्ह्याची २०१६ ते २०२० या पाच वर्षांत सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ६८ हजार ४०० हेक्टर होते. तर उत्पादकता प्रतिहेक्टरी ९.२५ क्विंटल (एकरी ३.७ क्विंटल) होती. गतवर्षी (२०२१) मध्ये सोयाबीनची २ लाख ५५ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ९.८३ क्विंटल ( एकरी ३.९३ क्विंटल) होती.
२०२२ मध्ये सोयाबीन क्षेत्र २ लाख ६० हजार २०० हेक्टर आणि उत्पादकता प्रतिहेक्टरी १०.५० क्विंटल प्रस्तावित होते. प्रत्यक्षात २ लाख ५७ हजार ४२९ हेक्टरवर पेरणी झाली.
एकूण ३६० पैकी ३५८ पीक कापणी प्रयोग झाले.त्यानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी १५ क्विंटल ८८ किलो आल्याचे स्पष्ट झाले आहे. पीक उत्पादनातील घट या बाबी अंतर्गत विमा भरपाईसाठी उत्पादकतेचे महत्त्व आहे.
२०२२-२३ सोयाबीन उत्पादकता प्रतिहेक्टरी उत्पादकता स्थिती (क्विंटलमध्ये)
तालुका..प्रतिहेक्टरी उत्पादकता
परभणी...१४.५०
जिंतूर...१३.०४
सेलू...१६.५७
मानवत...२०.०१
पाथरी...२०.६४
सोनपेठ...१२.२५
गंगाखेड...९.०१
पालम...१९.३८
पूर्णा...१७.१४
हिंगोली...१७.३४
कळमनुरी...१४.६०
वसमत...१६.४७
औंढा नागनाथ...१३.९२
सेनगाव...१५.८८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.