Soybean : एकूण पेरणीच्या निम्मे क्षेत्र सोयाबीन

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पेरणी झालेल्या ४७ लाख ३९ हजार ९६५ क्षेत्रापैकी २३ लाख ९८ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.
Soybean
Soybean Agrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पेरणी (Kharif Sowing) झालेल्या ४७ लाख ३९ हजार ९६५ क्षेत्रापैकी २३ लाख ९८ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) झालेली आहे.गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात जवळपास एक लाख चार हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र (Soybean Sowing Acreage) वाढले आहे.

Soybean
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

दुसरीकडे अतिवृष्टी, सततचा पाऊस व कीड रोगांचे आक्रमण यामुळेही नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक दणका क्षेत्र जास्त असलेल्या सोयाबीनलाच बसला आहे. नुकसानीत दुसरा क्रमांक कपाशी व तिसरा क्रमांक इतर पिकांच्या लागतो आहे. यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४७ लाख ३९ हजार ९६५ अर्थात ९७.५९ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. जालना वगळता एकाही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र इतकी पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाचा अहवाल सांगतो. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रात ५०.६१ टक्के क्षेत्र सोयाबीनचे आहे.

Soybean
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

जवळपास २३ लाख ९८ हजार ९६७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर २८.८७ टक्के म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १३ लाख ६८ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी आहे. मूग, उडीद, तूर, मक्का बाजरी इतर पिकांची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २०.५२ टक्के म्हणजे जवळपास ९ लाख ७२ हजार ४४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी खरीप हंगामात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनची ४७.८९ म्हणजे २२ लाख ९४ हजार ८६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामध्ये जवळपास १ लाख ४ हजार हेक्टरने यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. गतवर्षी कपाशीची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २६.८३ टक्के म्हणजे जवळपास १२ लाख ८५ हजार २९० हेक्टर वर पेरणी झाली होती. यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या २८.८७% म्हणजे १३ लाख ६८ हजार ५५८.२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ८३२६८ हेक्टरने कपाशीचे क्षेत्रही वाढले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्र पैकी जवळपास ७० टक्के क्षेत्र सोयाबीनचे तर दहा ते वीस टक्के क्षेत्र कपाशीचे व उर्वरित क्षेत्र इतर पिकांचे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जून जुलै मध्ये मराठवाड्यातील चार लाख ४८ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राला अतिवृष्टी पूर आदींमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा फटका बसला होता. याशिवाय ऑगस्ट च्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातही सतत होत असलेल्या पावसामुळे पीक पिवळी पडणे, सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांची अपेक्षित वाढ न होणे, पिवळा मोझॅक, शंखी गोगलगायी यासह विविध कीड रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी पीक बरे दिसत असली तरी बहुतांश ठिकाणी सोयाबीन व कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सततच्या व अति पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान आहे. जवळपास ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे.

- तानाजी वाडीकर, नागलगाव, जि. लातूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com