Soybean Rate : ऐन सुगीत परतीच्या पावसाचा सोयाबीन, कपाशीला फटका

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सोयाबीनची काढणी, कापूस वेचणी कामांचा खोळंबा झाला आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग चार दिवसांपासून पाऊस (Constant Rain) सुरू आहे. सोयाबीनची काढणी (Soybean Harvesting), कापूस वेचणी (Cotton Piking) कामांचा खोळंबा झाला आहे. पावसात भिजल्यामुळे शेतीमालाच्या दर्जावर (Crop Quality Down Due To Rain) परिणाम झाला आहे. त्यामुळे दर (Soybean Rate) कमी मिळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तत्काळ पीकविमा भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Soybean Rate
Organic Cotton : शेतकऱ्यांनी जाणले सेंद्रिय कापूस उत्पादनाचे तंत्र

यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ५ लाख १० हजार ७२४ हेक्टरवर पेरणी झाली. पेरणीक्षेत्रात सोयबीन २ लाख ६९ हजार ८०० हेक्टर, कपाशी १ लाख ७९ हजार ४४७ हेक्टर, तूर ३९ हजार ४८८ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. एकूण ६ लाख ७१ हजार ५७३ विमा प्रस्तावांद्वारे शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार ८१२ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. त्यात सोयाबीनसाठी ४ लाख ८ हजार ९४ शेतकऱ्यांनी ३ लाख ३४ हजार ९४ हेक्टर, कपाशीसाठी ६५ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ३१ हजार १०४ हेक्टर, तुरीसाठी ९३ हजार ८२३ शेतकऱ्यांनी ३६ हजार ६३३ हेक्टरसाठी संरक्षण घेतले आहे.

Soybean Rate
Soybean Harvesting : सोयाबीन कापणीवर पावसाचं सावट ?

हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ४६ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन २ लाख ५७ हजार ४२९ हेक्टर, कपाशी ३२ हजार १५९ हेक्टर, तूर ३८ हजार ४१८ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. एकूण ३ लाख ८० हजार ५०५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ८५१ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. त्यात सोयाबीनसाठी २ लाख ४६ हजार ४६४ शेतकऱ्यांनी १ लाख ८६ हजार ७४४ हेक्टर, कपाशीसाठी २० हजार ७६६ शेतकऱ्यांनी ६ हजार ७२० हेक्टर, तुरीसाठी ५२ हजार ६०४ शेतकऱ्यांनी १५ हजार १८२ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

सोयाबीन, कापूस भिजला

ऑगस्ट महिन्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे उत्पादनात घट येत आहे. आता ऐन सुगीत पाऊस सुरू असल्याने काढणीस आलेले, तसेच काढणी केलेले सोयाबीन, फुटलेल्या बोंडातील कापूस भिजला आहे. सततच्या पावसामुळे शेंगा, बोंडावर बुरशी वाढली आहे. अनेक भागांत कापणी केलेल्या सोयाबीनमध्ये पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. अडीच एकर पीक कापणी करून जमा केले. परंतु चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे उर्वरित सोयाबीनच्या काढणीत अडचणी येत आहेत. बोंडातून फुटलेला कापूस भिजून नुकसान झाले.
बाजीराव शेवाळे, गणपूर, जि. परभणी
यंदा अतिवृष्टीमुळे खूप फटका बसला आहे. आता सुगीत दररोजच्या पावसामुळे काढणी करता येत नसल्याने शेतातील सोयाबीन काळे पडले आहे. पीकविमा नुकसान भरपाई द्यावी.
राजकुमार सांगळे, गोजेगाव, जि. हिंगोली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com