Cotton : कापूस उत्पादकता- गुणवत्ता सुधारासाठी विशेष समिती

लागवड क्षेत्राच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असणार आपला देश उत्पादकतेच्या बाबतीत मात्र पिछाडीवर आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

नागपूर : लागवड क्षेत्राच्या (Cotton Cultivation) बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असणार आपला देश उत्पादकतेच्या (Productivity OF Cotton) बाबतीत मात्र पिछाडीवर आहे. उत्पादित कापसाचा दर्जा (Quality OF Cotton) देखील नाही. त्या पार्श्वभूमीवर उत्पादकता वाढ आणि गुणवत्ता सुधार या बाबींना प्राधान्य देत विशेष समितीचे स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

कापसाची गुणवत्ता (Cotton Quality) आणि उत्पादकता (Cotton Productivity) या विषयावरील एका विशेष बैठकीचे आयोजन रविवारी (ता. २४) दिल्ली येथे करण्यात आले होते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल, वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, कापूस प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, तज्ज्ञ यांची या बैठकीला उपस्थिती होती.

महाराष्ट्रातून दिलीप गुलाबराव ठाकरे तसेच रविकिरण पाटील, राजस्थानमधील एक याप्रमाणे शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला निमंत्रित होते. भारताचे कापूस लागवड क्षेत्र १३० लाख हेक्टर आहे. इतर कापूस उत्पादक देशाच्या तुलनेत ते सर्वाधिक असले तरी कापसाची प्रतिहेक्टरी उत्पादकता मात्र इतर कापूस उत्पादक देशाच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यासोबतच प्रक्रिया होणाऱ्या कापसाचा दर्जा नसल्याने इतर अनेक देशांमधून भारतीय कापसाला मागणी राहत नाही. हे चित्र बदलण्यासाठी काय केले पाहिजे या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

Cotton Production
तेलंगणात अतिघन कापूस लागवडीचा पथदर्शी प्रकल्प
Cotton Production
Cotton : कापूस वेचणी यंत्राची चाचणी अंतिम टप्प्यात

यावेळी प्रक्रिया उद्योजकांनी देशात जागतिक पातळी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी मागणी जोरकसपणे लावून धरली.

Cotton Production
कापूस, हरभरा, हळदीच्या किमतींत घट

यांत्रिकीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा

कापूस शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे हा मुद्दा बैठकीत चर्चेला आला. कारण सध्या मजुराद्वारे कापसाची वेचणी होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पाऊच, तंबाखूच्या पुड्या, केस अशा प्रकारचा कचरा येतो. तब्बल १२ प्रकारचा कचरा प्रक्रिया उद्योजकांना वेगळा करावा लागतो. त्याकरता वेगळी यंत्रणा उभारावी लागते. परिणामी कापूस शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यास पहिल्या टप्प्यातच कचरा वेगळा करता येणार आहे. त्यामुळे कापसाची गुणवत्ता सुधारेल.

कापसाची उत्पादकता वाढण्यासाठी अतिसघन पद्धतीने लागवड करून एकरी जणांची संख्या वाढली पाहिजे. मी गेल्या सात वर्षांपासून साडेपाच लाख रुपयांचे संयंत्र खरेदी करून या पद्धतीने लागवड करीत आहे. पारंपरिक पद्धतीत एकरी दहा हजार झाडे बसतात. मात्र सघन लागवड पद्धतीत दोन ओळीत ९० सेंटीमीटर तर दोन झाडांत पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवल्यास २९ हजार झाडे बसतात. ४००० झाडे बाद ठरली तरी २५००० झाडे राहतात. प्रति बोंड चार ग्रॅम कापूस त्यानुसार एकरी १५ क्विंटलची उत्पादकता मिळते. मला जास्तीत जास्त अठरा क्विंटल पर्यंत उत्पादकता मिळाली आहे.
दिलीप ठाकरे, प्रयोगशील शेतकरी
प्रक्रिया उद्योजक, तज्ज्ञ शेतकरी, शास्त्रज्ञ यांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यासंदर्भात केंद्र सरकार सकारात्मक आहे. लवकरच ही समिती अस्तित्वात येत देशात कापसाची उत्पादकता आणि दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
डॉ, वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com