Soybean Rate : तेलबिया, खाद्यतेलावरील स्टाॅल लिमिट काढले

सरकारने आधी दोन महिन्यांसाठी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र देशातील खाद्यतेल दर कमी होत नाही म्हटल्यावर सरकारने स्टाॅक लिमिटला ३० मार्च रोजी पुन्हा मुदतवाढ दिली.
Soybean Stock Limit
Soybean Stock LimitAgroowon

केंद्र सरकारने जानेवारी २०२३ पासून तेलबिया आणि खाद्यतेलावरील स्टाॅक लिमिट रद्द केले आहे. तसेच प्रक्रियादार, स्टाॅकिस्ट आणि व्यापारी यांना आपल्याकडी साठ्याची नोंद देण्याचीही आवश्यकता नसल्याचे सरकारने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Soybean Stock Limit
Devendra Fadanvis : फडणवीसांनी जलसंपदा खात्याचा राजीनामा द्यावा- किसान सभा

भारताला २०२१ पासून खाद्यतेल दरवाढीच्या संकटाला सामोर जावं लागलं होतं. खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. तर रशिया आणि युक्रेन युध्दामुळे खाद्यतेलाच्या दरवाढीला फोडणी मिळाली. ग्राहकांचा रोष सरकारवर वाढला होता. सरकारनं खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी केले. मात्र तरीही खाद्यतेलाचे दर कमी झाले नाही. त्यामुळे शेवटी सरकारने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टाॅक लिमिट लावले होते.

सरकारने आधी दोन महिन्यांसाठी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र देशातील खाद्यतेल दर कमी होत नाही म्हटल्यावर सरकारने स्टाॅक लिमिटला ३० मार्च रोजी पुन्हा मुदतवाढ दिली. तसंच २ नोव्हेंबर रोजी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढवली होती. पण आता सरकारने अधिसूचना काढून ३१ डिसेंबर २०२२ नंतर तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टाॅक लिमिट नसेल, असे सांगितले.

तसेच सरकारने व्यापारी, प्रक्रियादार आणि विक्रेते यांना आपल्याकडील साठ्याची नोंद सरकारच्या पोर्टलवर करण्याची सक्ती केली होती. त्यातूनही आता सुट मिळाली आहे.

सरकारने तेलबिया आणि खाद्यतेलावरी स्टाॅक लिमिट काढल्याचा फायदा सोयाबीनला मिळू शकतो. प्रक्रियादार, स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांना आता पाहिजे तेवढा साठा करता येईल. सोयाबीनसह मोहरी, भूईमूग आणि सूर्यफुल उत्पादकांनाही दिलासा मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com