Egg Rate : अंड्यांचे मनमानी दर जाहीर करणे थांबवा

अंड्याचे दर अचानक कमी होण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. या मुद्द्याकडे लक्ष वेधत राज्य कुक्कुटपालन समन्वय समिती सदस्यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.
Egg Rate
Egg RateAgrowon

Poultry Industry News : राष्ट्रीय अंडी समन्वय समिती (एनईसीसी)कडून अंड्याचे दर (Egg Rate) अचानक कमी केल्याने कुक्कुटपालक शेतकरी (Poultry Farmer) अडचणीत आले आहेत. परिणामी अर्थव्यवस्थेचे भविष्यात खूप मोठे नुकसान होईल.

अंड्याचे दर अचानक कमी होण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. या मुद्द्याकडे लक्ष वेधत राज्य कुक्कुटपालन समन्वय समिती सदस्यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्याकडे तक्रार केली आहे.

या प्रकरणाकडे लक्ष द्यावे तसेच वास्तविक डेटा आणि कायदेशीर प्राधिकरणाशिवाय राष्ट्रीय अंडी समन्वय समितीद्वारे मनमानी पद्धतीने दर जाहीर करण्याची प्रथा थांबवावी, अशी मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज १.२५ कोटी अंड्यांचा तुटवडा असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

मात्र उत्पादन खर्चात अचानक वाढ होत असतानाही अंड्यांचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय अंडी समन्वय समिती अंडी उत्पादन खर्च, मागणी आणि पुरवठा अशा कोणत्याही वास्तविक माहितीच्या आधारावर दर जाहीर करीत नाही. ही खासगी संस्था आहे.

Egg Rate
Poultry Disease : ई-कोलाय: कोंबड्यातील जिवाणूजन्य रोग

ती नेहमी व्यापाऱ्यांच्या बाजूने असते. त्यामुळे उद्योगाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा. या समितीचे सर्व अधिकार काढून घ्यावेत.

हे अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला द्यावेत, किमान आधारभूत किंमत ठरविण्यासाठी कायदेशीर संस्था स्थापना आणि त्रैमासिक आधारावर उत्पादन खर्च आणि अंड्यांची मागणी, हंगामाच्या आधारावर अंड्याचे दर जाहीर करण्याचे नियोजन करावे.

अंडी साठवण्यासाठीच्या शीतगृहांचा तपशील आणि गेल्या ५ वर्षांपासून त्या पायाभूत सुविधांचा वापर करणारे पक्ष, एजंट आणि व्यापाऱ्यांना राष्ट्रीय अंडी समन्वय समितीद्वारे विचारणा करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

गेल्या तीन वर्षांतील उत्पादन खर्च, दरस्थिती :

वर्ष... - प्रतिअंडी दर (रुपये)...प्रतिअंडी उत्पादन खर्च (रुपये)

जानेवारी २०२१ - ४.३१ - २.३

जानेवारी २०२२ - ४.७६ - ३.०

जानेवारी २०२३ - ४.७५ - ४.०

(संदर्भ : राज्य कुक्कुटपालन समिती सदस्यांनी दिलेली आकडेवारी)

Egg Rate
Egg Rate : अंडी दर उत्पादन खर्चाच्या खाली; कुक्कटपालकांनी व्यक्त केला संताप

आज तातडीची बैठक

कुक्कुटपालकांच्या अडचणीसंबंधी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुणे येथे आज (ता.९) तातडीची बैठक बोलावली आहे, अशी माहिती राज्य कुक्कुटपालन समितीचे सदस्य धनंजय आहेर यांनी दिली. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो? याकडे कुक्कुटपालकांचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अंदाजे प्रतिअंडी १ ते १.५ रुपयांचे नुकसान झाले. अलीकडे आठ दिवसांत १.५० रुपयांची घसरण झाली आहे. या अधिक गुंतवणुकीच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा नफा मिळण्याची शक्यता नाही. मात्र राष्ट्रीय अंडी समन्वय समिती व त्यांना जोडलेले ट्रेडर्स यांचा फायदा होत आहे. त्यामुळे हमीभावाची रणनीती आखून शेतकऱ्यांच्या हिताचे नियोजन व्हावे.
सुदर्शन पोकळे, सदस्य, राज्यस्तरीय कुक्कुटपालन समन्वय समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com