Sugar Conference : शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्यापासून साखर परिषद

‘दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’कडून (डीएसटीए) आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्‍घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

पुणे ः देशाच्या साखर उद्योगातील (Sugar Industry) ९०० तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांचा सहभाग असलेली दोनदिवसीय साखर परिषद (Sugar Conference) रविवारपासून (ता. १८) पुण्यात सुरू होत आहे. ‘दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’कडून (डीएसटीए) आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्‍घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे.

Sharad Pawar
Sugar Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर समाधानकारक

सेनापती बापट मार्गावरील जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे सकाळी दहा वाजता परिषदेचा उद्‍घाटन सोहळा होत आहे. साखर उद्योग व संलग्न व्यवसायांशी संबंधित संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित असतील. याशिवाय ५५ प्रदर्शक कंपन्यांचा सहभाग यात असेल. परिषदेत कृषी, अभियांत्रिकी, उत्पादन, व्यवस्थापन, सहउत्पादन या विषयांवर ४७ शोधनिबंध सादर होणार आहेत.

Sharad Pawar
Sugar Industry : शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्ट

देशाच्या साखरनिर्मिती उद्योगात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव या वेळी केला जाणार आहे. तसेच, श्री. पवार यांच्या हस्ते साखर उद्योग गौरव पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तांत्रिक शोधनिबंध पुरस्कार दिले जाणार आहेत.

डीएसटीए’चे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, उपाध्यक्ष एस. बी. भड, विक्रमसिंह शिंदे, साखर परिषद समितीचे चेअरमन सोहन शिरगावकर गेल्या काही दिवसांपासून या परिषदेची तयारी करीत आहेत. श्री. गंगावती यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘डीएसटीए’ची स्थापना उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांनी १९३६ मध्ये केली. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात व कर्नाटकमधील साखर उद्योगाच्या तांत्रिक गरजांची पूर्तता होते आहे. साखर उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या संस्थेमुळेच मिळाली. साखर उद्योगाशी संबंधित तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रातील २२०० तज्ज्ञांचा समावेश ‘डीएसटीए’मध्ये आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com