उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन घटले

देशात यंदा विक्रमी साखर उत्पादन होत असताना उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. साखरनिर्मितीत दबदबा असणाऱ्या उत्तर प्रदेशचा साखर हंगाम पिछाडी कायम राखत संपला आहे.
उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन घटले
Sugarcane in UPAgrowon

कोल्हापूर : देशात यंदा विक्रमी साखर उत्पादन (Sugar Production) होत असताना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) साखर उत्पादन मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. साखरनिर्मितीत दबदबा असणाऱ्या उत्तर प्रदेशचा साखर हंगाम पिछाडी कायम राखत संपला आहे.

उत्तर प्रदेशात १०२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी ११० लाखांहून अधिक टन साखर उत्पादन करत उत्तर प्रदेश देशात अग्रेसर राहिला होता. यंदा ही आघाडी मोडून काढत महाराष्ट्रने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेतली. उत्तर प्रदेशात हंगाम पूर्णपणे संपला आहे. तर महाराष्ट्रात अजूनही साखर कारखाने सुरू आहेत. महाराष्ट्रात मेअखेर १३२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच उत्तर प्रदेशमध्ये साखर उत्पादनाची पिछाडी पाहावयास मिळाली.

यंदा हंगामाच्या पहिल्या महिन्यापासूनच उत्तर प्रदेशची साखर उत्पादनात पिछाडी राहिली. ती अखेरपर्यंत कायम राहिली. यंदा उत्तर प्रदेशात १२० साखर कारखाने सुरू होते. राज्यात हंगामाच्या सुरुवातीलाच किडीमुळे उसाचे एकरी उत्पादन घटले, यामुळे तिथे साखरनिर्मितीची गती कमी झाली.

मार्च अखेरपर्यंत उत्तर प्रदेशातील सुमारे ८० टक्के हंगाम संपला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारखाने बंद होण्याची गतीही अधिक होती. प्रत्येक वर्षी जूनच्या मध्यापर्यंत उत्तर प्रदेशातील हंगाम सुरू असतो. त्याच्या उपलब्धतेअभावी कारखाने लवकर बंद झाले आहेत. महाराष्ट्रापेक्षा सरासरी ३० ते ३५ लाख टनांनी उत्तर प्रदेश पिछाडीवर राहिला. उत्तर प्रदेशात रोग-किडीने यंदा उसाचे नुकसान झाले.

याच बरोबर काही कारखाने इथेनॉलकडेही वळले. याचा एकत्रित परिपाक साखर उत्पादन घटण्यावर झाला आहे. साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० जूनअखेर उत्तर प्रदेशात २७ हजार कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. एकूण ऊसगाळप केलेल्या रकमेपैकी ७६ टक्के एफआरपी उत्तर प्रदेशने शेतकऱ्यांना दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com