
Sugar Production In Marathawada औरंगाबाद : यंदा मराठवाड्यात ऊस गाळप हंगामाची (Sugarcane Crushing Season) गती थोडी जास्त आहे. आठही जिल्ह्यांतील ६२ कारखान्यांनी ऊसगाळपात सहभाग घेत १ कोटी ६१ लाख ८३ हजार ४२७ टन उसाचे काळप करत १ कोटी ५१ लाख ३६ हजार ५४५ क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे.
गतवर्षीच्या ऊस गाळपाप्रमाणे यंदाही काही भागात जास्तीच्या उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उसाच्या उत्पादनात घटही झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा गाळपात सर्वाधिक १३ कारखाने उस्मानाबाद जिल्ह्यातील सहभागी झाले. त्यापाठोपाठ लातूरमधील ११, बीडमधील आठ, परभणी व औरंगाबादमधील प्रत्येकी ७, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी ५ व नांदेडमधील ६ कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदविला.
त्यापैकी उस्मानाबादच्या लोकमंगल कारखान्याचे ऊसगाळप १ फेब्रुवारीला उरकले. तर बीडच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळपच केलेले नाही.
जिल्हानिहाय कारखाने व गाळप स्थिती ः
उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ३६ लाख ६० हजार ९५३ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.८३ टक्के साखर उताऱ्याने ३३ लाख २१ हजार ८९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
औरंगाबादमधील ७ कारखान्यांनी १३ लाख ९४ हजार ५६६ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.२१ टक्के साखर उताऱ्याने १४ लाख २३ हजार ५५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
बीडमधील ८ कारखान्यांनी २५ लाख ७७ हजार २१० टन गाळप करत सरासरी ७.५५ टक्के उताऱ्याने १९ लाख ४५ हजार ६९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जालन्यातील ५ कारखान्यांनी १४ लाख २९ हजार ८५१ टन गाळप करत सरासरी ९.८३ टक्के उताऱ्याने १४ लाख ६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
परभणीतील ७ कारखान्यांनी १९ लाख १८ हजार ५० टन उसाचे गाळप करत १८ लाख ५८ हजार ३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
हिंगोलीतील ५ कारखान्यांनी अकरा लाख ५१ हजार २३१ टन उसाचे गाळप करत १२ लाख ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. लातूरमधील ११ कारखान्यांनी २६ लाख ९९ हजार ६२२ टनांचे गाळप करत सरासरी ९.८० टक्के उताऱ्याने २६ लाख ४५ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
तर नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १३ लाख ५१ हजार ९४४ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८७ टक्के साखर उताऱ्याने १३ लाख ३४ हजार ८३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
हिंगोलीचा सर्वाधिक साखर उतारा
यंदा २ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ६१ लाख ८३ हजार ४२७ टन उसाचे गाळप झाले. त्यातून १ कोटी ५१ लाख ३६ हजार ५४५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
त्यात हिंगोली जिल्ह्यातील पाचही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.४३ टक्के राहिला. तर सर्वांत कमी ७.५५ टक्के उतारा बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा राहिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.