Maize Market : मक्याची आवक वाढली

चालूवर्षी मक्याला मागणी कायम राहिल्याने दरात तेजी दिसून आली होती. एप्रिलमध्ये २ हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.; मात्र वादळी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर हंगाम काहीसा प्रभावित झाला.
Maize Market
Maize MarketAgrowon

Maize Market Update चालूवर्षी मक्याला मागणी कायम राहिल्याने दरात (Maize Rate) तेजी दिसून आली होती. एप्रिलमध्ये २ हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.; मात्र वादळी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर हंगाम काहीसा प्रभावित झाला.

त्यातच पुन्हा रब्बी हंगामातील नवा मका बाजारात (Maize Arrival) येऊ लागला आहे. त्यामुळे आता मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढत आहे. त्यामुळे चालू महिन्यात दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी घसरण झाल्याची स्थिती आहे.

२०२२-२३ खरीप हंगामासाठी मक्याला प्रतिक्विंटल १,९६२ रुपये हमीभाव होता. राज्यात आता मक्याला क्विंटलला किमान १,४०१ रुपये ते कमाल २,२५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. तर सरासरी १,७०० ते १,८०० रुपये दर आहे.

मागील खरीप मका आवक कमी आल्याने दरात तेजी कायम होती. त्यामुळे मागणी असल्याने व पुरवठा कमी होत असल्याने दरात सातत्य दिसून आले.

हे दर किमान आधारभूत किमतीवर राहिले.एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत २ हजार रुपयांवर दर टिकून होते.मात्र तिसऱ्या सप्ताहापासून आवकेत सुधारणा दिसून आली तर दर हळूहळू कमी झाल्याचे दिसून आले.

Maize Market
Maize Market : मक्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढणार का?

सध्या बाजार समित्यांमध्ये आवारात व मका खरेदी विक्री केंद्रांवर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड भागातून रब्बी हंगामातील नव्या रब्बी मक्याची अवाक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.

मागील महिन्याच्या तुलनेत सध्या १५० ते २०० रुपये प्रतिक्विंटलमागे दर कमी झाले आहेत, अशी माहिती येवला येथील रेशीमसुत ट्रेडिंग कंपनीचे संचालक गोकूळ भागवत यांनी दिली.

पोल्ट्री उद्योगाची मागणी असली तरी पुरवठा वाढल्याने दरात घसरण आहे. शिवाय सततच्या पावसामुळे रब्बी हंगाम प्रभावित झाला आहे. नवीन मका पुरेशा वाळला नसल्याने तसेच मका ओला होऊन काही ठिकाणी प्रतवारी घसरल्याने दरावर परिणाम दिसून येत आहे.

Maize Market
Maize Arrival : खानदेशात मक्याची आवक सुरू

मका दर स्थिती:

बाजार...आवक...किमान...कमाल...सरासरी (ता.५ अखेर)

निफाड (लासलगाव)...३७२...१,६९१...१,९२०...१,८७०

विंचूर (लासलगाव)...१,२२६...१,५००...१,८९०...१,७५०

मनमाड...१९३...१,५५०...१,८११...१,७८६

पालखेड (पिंपळगाव बसवंत)...४६४...१,४०१...१,९९१...१,८००

येवला...६३१..१,८५०...१,९१२...१,८७२

साक्री...१८०...१,८००...२,०६०...२,०५०

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

दर कमी होण्याबाबतची कारणे...

- देशभरात प्रमुख रब्बी उत्पादक पट्टा असलेल्या बिहार, तेलंगणामधून पुरवठा वाढला

- मागील महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात निर्यात कमी

- उत्तर महाराष्ट्रात रब्बी मक्याचा पेरा वाढल्याने मका उपलब्धतेत वाढ

मक्याचे दर स्थिरावण्याची शक्यता

‘‘मका सुकलेला असेल दर १,९०० रुपयांपर्यंत दर आहेत. सध्या तेलंगणा सरकारने आधारभूत दराने मका खरेदी सुरू केल्याने दर स्थिरावतील अशी स्थिती आहे. मात्र खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामातील निर्यात कमी आहे,’’ अशी माहिती आनंद ‘ॲग्रो ग्रुप’चे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी दिली.

बाजारात मागील खरीप हंगामातील मक्यासह चालू रब्बी हंगामात काढणी झालेला मकाही वाळून बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे आवक वाढल्याने सध्या दर कमी झाल्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे.
- प्रतिक बंब, मका व्यापारी, मनमाड बाजार समिती.
खरिपातील मका अजूनही काही प्रमाणात शिल्लक आहे. तर रब्बीतील नवा मका बाजारात आल्याने पुरवठावाढ दिसून येत आहे. याशिवाय रब्बीचे चांगल्या प्रमाणावर उत्पादन असल्याने दर कमी झाले आहे.
- मनोज कापसे, पोल्ट्री व्यावसायिक, देवळा.
दर सध्या घसरल्याने बाजारपेठ अंदाज घेऊन नवा मका टप्प्याटप्प्याने विक्री करणार आहोत.
- निवृत्ती न्याहारकर, मका उत्पादक, वाहेगाव साळ, ता. चांदवड.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com