Orange Market : नगरला संत्रा, सीताफळाची आवक वाढली

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात संत्रा, सीताफळाची आवक वाढली.
Carket Committee
Carket CommitteeAgrowon

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar Market Committee) मागील आठवड्यात संत्रा, सीताफळाची आवक (Orange Arrival) वाढली. भाजीपाल्यात टोमॅटो, बटाटे, हिरवी मिरची यांना चांगली मागणी राहिली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला फळांची साधारण साडेसातशे क्विंटल पर्यंत अवाक झाली. त्यात मोसंबीची ११५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

Carket Committee
Market Committee : नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे हाल

संत्राची २२६ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ६०००, डाळिंबाचे १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते १५०००, पपईची २१ क्विंटलपर्यंत आवक होऊन पाचशे ते साडेतीन हजार रुपये तर पेरूची ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन पाचशे ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. केळीची ३१ क्विंटल पर्यंत आवक होऊन ९०० ते १५०० रुपयापर्यंत दर मिळाला. ड्रॅगन फूडची बाजार समितीत आवक होत आहे. दर दिवसाला साधारणतः १० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ९ हजार रुपयापर्यंत दर मिळाला.

भाजीपाल्यात टोमॅटोची १२९ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते अडीच हजार रुपये, वांग्याची ३८ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते साडेचार हजार रुपये, फ्लॉवरची ६६ क्विंटल पर्यंत आवक होऊन सहाशे ते साडेतीन हजार रुपये, कोबीची ५३ क्विंटलपर्यंत आवक होऊन पाचशे ते दोन हजार रुपये, काकडीची ५० क्विंटलपर्यंत आवक ८०० ते २१०० रुपये

गवारची आठ क्विंटलपर्यंत आवक होऊन तीन हजार ते साडेसहा हजार रुपये, घोसाळ्याची १३ क्विंटलपर्यंत आवक होऊन पंधराशे ते साडेतीन हजार रुपये, दोडक्याची १५ क्विंटल पर्यंत आवक होऊन २००० ते ४ हजार रुपये, कारल्याची दहा क्विंटलपर्यंत आवक होऊन २००० ते साडेतीन हजार रुपये

भेंडीची तीस क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते तीन हजार रुपये, वाल शेंगाची सात क्विंटलपर्यंत आवक होऊन चार हजार ते साडेपाच हजार रुपये, घेवड्याची दहाक्विंटलपर्यंत आवक होऊन तीन हजार ते साडेपाच हजार रुपये, बटाट्याची पावणे पाचशे क्विंटलपर्यंत आवक होऊन १७०० ते २३००, हिरव्या मिरचीची ११० क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते चार हजार रुपये, शेवग्याची दहा क्विंटलपर्यंत आवक होऊन साडेतीन हजार ते आठ हजार रुपये, दुधी भोपळ्याची ३१ क्विंटलपर्यंत आवक होऊन पाचशे ते दोन हजार रुपये, मका कणसाची दहा क्विंटलपर्यंत आवक होऊन सहाशे ते एक हजार रुपये, सिमला मिरचीची नऊ क्विंटलपर्यंत आवक होऊन ३४०० ते ५००० रुपये दर मिळाला आहे

कांद्याच्या दरात चढ-उतार

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याची शनिवारी (ता. ५) एक लाख पाच हजार गोण्याची आवक झाली त्या दिवशी पाचशे ते तीन हजार तीनशे रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला. त्या आधीच्या म्हणजे गुरुवार (ता. ३) लिलावाला ९५ हजार गोण्याची आवक होऊन ५०० ते ३४०० चा दर मिळाला.

Carket Committee
Crop Damage Compensation : शेतकऱ्यांच्या तत्काळ मदतीची रक्कम द्या

राज्यात कांद्याला सगळीकडे चांगला दर मिळत असताना नगरमध्ये मात्र बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे जाणीवपूर्वक दर पाडले जात असल्याचा आरोप करत एकाच आठवड्यात दोन वेळा शेतकऱ्यांनी आंदोलन करत लिलाव बंद पाडले. नगर तालुक्याचे नेते संदेश कारले यांनीही संताप व्यक्त करत दर पडल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील कांदा बाजारातील कारभार चावट्यावर आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com