top 5 news -सरकारी गहू खरेदी उद्दीष्टापेक्षा कमीच!

गहू निर्यातबंदी केल्यानंतर सरकारी खरेदीला प्रतिसाद वाढला आहे. काही राज्यांत प्रतिसाद मिळाला तर काही राज्यांतील खरेदी कमी झाली आहे. मात्र सरकारची खरेदी अद्यापही उद्दीष्टापेक्षा कमीच आहे. सरकारची गहू खरेदी नेमकी किती झाली? शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळत आहे?
 top 5 news -सरकारी गहू खरेदी उद्दीष्टापेक्षा कमीच!
wheatagrowon

१. २०२१-२२ च्या हंगामात रेशीम उत्पादन निर्यात वाढलीये. गेल्या हंगामात सहा वर्षांतील निच्चांकी निर्यात झाल्यानंतर यंदा वाढ झाली. भारतीय रेशीम कार्पेट आणि तयार कपड्यांना यंदा मागणी वाढलीये. चालू हंगामात युरोप आणि अमेरिका या बाजारपेठांमध्ये निर्यात होतेय. परिणामी निर्यातीतून मिळणारे उत्पन्न वाढले. २०२०-२१ च्या हंगामात देशातून सहा वर्षांतील निच्चांकी निर्यात झाली होती. या वर्षातील निर्यात १४१२ कोटी रुपयांवर होती. तर चालू हंगामात १९२५ कोटी डाॅलरवर निर्यात पोचली. भारतीय रेशीम उत्पादनांना मागणी वाढल्यानं देशात आणि राज्यात वाढलेल्या रेशीम शेतीला दिलासा मिळतोय. महाराष्ट्रातही रेशीम शेतीचा विस्तार झालाय. निर्यातवाढीनं उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यताये.

२. केंद्र सरकारनं दिलेलं खरेदीचं उद्दीष्ट संपल्यानं हरभरा (gram)खरेदी बंद पडली. त्यामुळं हजारो शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हरभरा विकण्याची वेळ आलीये. राज्यात प्रत्येक खरेदी केंद्रावर नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या हजरांमध्ये आहे. हे शेतकरी सरकारच्या निर्णयाची वाट पाहतायेत. चालू हंगामात हरभऱ्यासाठी सरकारनं ५२३० रुपये हमीभाव जाहिर केलाय. मात्र बाजारात ४२०० ते ४८०० रुपये दर मिळतोय. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा ५०० ते १००० रुपये कमी दर मिळतोय. यामुळंही शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलीये. या परिस्थितीत सरकारनं खेरदी सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरजये.

३. देशात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात, म्हणजेच मार्च २०२१ ते एप्रिल २०२२ या काळात ८ लाख ४० हजार टनांची आयात झाली. ही आयात आत्तापर्यंतची विक्रमी ठरली. मागील आर्थिक वर्षात ४ लाख ४२ हजार टन तर २०१९-२० या वर्षात ४ लाख ४९ हजार टन आयात झाली होती. या २०२१-२२ मध्ये मागील दोन्ही हंगामाएवढी तूर आयात झाली. त्यामुळं तुरीचे(tur) भाव दाबावातये. शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्याचा कालावधी संपत आला तरी दर सुधारत नाहीयेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सरकारनं हे धोरण बदलण्याची मागणी शेतकरी करतायेत.

४. देशात मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मे मधील पामतेल आयात कमी झालीये. मार्च महिन्यातील पामतेल(palm oil) आयात ५.३९ लाख टन होती. तर एप्रिलमध्ये ५.७२ लाख टनांवर पोचली. मात्र मे मधील आयात ५.१४ लाख टनांवरच स्थिरावल्याचं साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिशन ऑफ इंडियानं सांगितलं. दुसरीकडं सोयाबीन तेल आयात मात्र वाढली. पामतेलाच्या दरातील तेजीमुळं भारतानं सोयातेलाला अधिक पसंती दिली होती. मे महिन्यात विक्रमी ३.७३ लाख टन सोयातेल देशात आलं. तर सूर्यफूल तेल आयातही वाढून १.१८ टनांवर पोचल्याचं जाणकारांनी सांगितलं.

wheat
दूध एफआरपीः शेतकरी संघर्ष समितीची अजित पवार यांच्याशी चर्चा

५. गहू खरेदीला प्रतिसाद मिळत नसल्यानं सरकारनं गहू निर्यातबंदी केली. मात्र तरीही सरकारची गहू खरेदी वाढलेली नाहीये. सरकारच्या अपेक्षेपेक्षा कमी गहू खरेदी झाला. अद्यापही खुल्या बाजारात गव्हाला(wheat) हमीभावापेक्षा ५० ते ८० रुपये जास्त मिळतायेत. त्यामुळं शेतकरी खुल्या बाजाराला जास्त पसंती देताना दिसतायेत. १३ मे रोजी सरकरानं गहू निर्यातबंदी केली. तोपर्यंत सरकराची गहू खरेदी १७७ लाख ९९ हजार टनांवर पोचली होती. त्यानंतर त्यात ९ लाख ६३ हजार टनांची भर पडली. गहू निर्यातबंदीनंतर मध्य प्रदेशात सर्वाधीक ४ लाख ६१ हजार टनांची खरेदी झाली. तर उत्तर प्रदेशात २ लाख ९७ हजार टन आणि हरियानात १ लाख ९ हजार टन गहू शेतकऱ्यांनी सरकारला विकला. पंजाबमध्ये सरकारी खरेदीला अद्यापही कमी प्रतिसाद मिळतोय. निर्यातबंदीनंतर येथे केवळ ९१ हजार टनांची खरेदी करण्यास सरकारला यश आलं. हंगामातील एकूण खरेदीचा विचार करता पंजाबमध्ये सर्वाधिक खेरदी झाली. येथील शेतकऱ्यांनी ९४ लाख ४७ हजार टन गहू सरकारला विकला. त्यानंतर मध्य प्रदेशात जवळपास ४६ लाख टन, हरियानात ४२ लाख टन तर उत्तर प्रदेशात सव्वातीन लाख टनांची खरेदी झाली. यावरून असं दिसत की निर्यातबंदीनंतर उत्तर प्रदेशात सरकारच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. कारण त्याआधी केवळ २३ हजार टनांची खरेदी करण्यास सरकार यशस्वी ठरलं होतं. असं असलं तरी सरकारला अद्यापही १९२ लाख टनांचं उद्दीष्ट गाठता आलेलं नाही. खुल्या बाजारात शेतकऱ्यांना अद्यापही चांगाल दर मिळत असल्यानं सरकारला आत्तापर्यंत केवळ १८७ लाख ६३ हजार टनांची खरेदी झालीये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com