Poultry Industry : ब्रॉयलर पक्ष्यांचे दर पोहोचले १०५ रुपयांपर्यंत

बाजारात करारदार कंपन्यांकडून कमी वजनाच्या पक्ष्यांचा पुरवठा होत असल्याने बाजारात मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमनुसार ब्रॉयलर पक्ष्यांचे दर सुधारले असून, दर १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
Poultry Industry | poultry rate today
Poultry Industry | poultry rate today Agrowon

अमरावती ः बाजारात करारदार कंपन्यांकडून कमी वजनाच्या पक्ष्यांचा पुरवठा (Poultry Supply) होत असल्याने बाजारात मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमनुसार ब्रॉयलर पक्ष्यांचे दर (Broiler Rate) सुधारले असून, दर १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना (Poultry Industry) दिलासा मिळाला आहे.

Poultry Industry | poultry rate today
Poultry Farming : परसबागेसाठी अर्धबंदिस्त कुक्कुटपालनाचे तंत्र

ब्रॉयलर पक्ष्यांचे वजन सरासरी दोन किलोपर्यंत असल्यास असा पक्षी खाण्यासाठी योग्य असतो, असा निष्कर्ष महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कुक्‍कुटपालन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद कदम यांनी अभ्यासाअंती मांडला होता. परंतु करारावर पोल्ट्री व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांकडून नफा कमविण्याच्या उद्देशाने पक्ष्यांचे वजन तीन किलोपर्यंत वाढविले जाते.

Poultry Industry | poultry rate today
Poultry : बंदिस्त पक्षिपालनातही केला पक्षीकल्याणाचा विचार

ब्रॉयलर पक्ष्यांचे इतके वजन होण्यासाठी कमी पशुखाद्याची गरज भासते. परंतु बाजारात तीन किलो वजनाचा पक्षी विक्रीसाठी गेल्यास त्याचा प्रभाव कमी वजनाच्या पक्षी बाजारात होतो आणि मागणी कमी होते. परिणामी दर घसरतात, असा अनुभव आहे. त्याचीच दखल घेत शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी कंपन्यांची ही मनमानी बंद व्हावी व बाजारात खवय्यांना चांगले मांस उपलब्ध व्हावे याकरिता पक्ष्यांचे वजन दोन किलोच असावे, अशी मागणी लावून धरली होती.

Poultry Industry | poultry rate today
Poultry Management : हिवाळ्यात जपा कोंबड्यांचे आरोग्य

खवय्यांकडून आता २ ते अडीच किलो वजनाच्याच ब्रॉयलर पक्ष्यांची मागणी होत असल्याने कंपन्यांकडून देखील तितक्‍याच वजनाच्या पक्ष्यांचा पुरवठा होत आहे. परिणामी, बाजारात तब्बल ९ महिन्यांनंतर ब्रॉयलरचे दर सुधारले असून, १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ९ महिन्यांपूर्वी ८५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या ब्रॉयलरची विक्री ८० रुपयांत करावी लागत होती.

२ किलो ते २ किलो १०० ग्रॅम या वजनाच्या ब्रॉयलर पक्ष्यांचा पुरवठा बाजारात होत आहे. परिणामी, दर १०५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कंपन्यांकडून आधी तीन किलोपेक्षा अधिक वजनाच्या पक्ष्यांचा पुरवठा बाजारात केला जात होता. ब्रॉयलरचे वजन २ किलोपर्यंत होण्यासाठी ८५ रुपयांचा खर्च होतो. ८० रुपयांत विक्री करावी लागत असल्याने नुकसान सोसावे लागत होते.

- शुभम महल्ले, पोल्ट्री व्यवसायिक व सदस्य अमरावती पोल्ट्री असोसिएशन

अधिक वजनाच्या कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी रबरासारखे लागत असल्याने ब्रॉयलरपासून ग्राहक दुरावला होता. आता दोन किलो ते २१०० ग्रॅम वजनाची कोंबडी खाण्यासाठी घ्यावी, अशी जागृती केली जात आहे. परिणामी, आता बाजारात अशा वजनाच्या कोंबड्यांना मागणी वाढली व पुरवठाही होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाशी निगडित साखळीमध्ये पैशांची उलाढाल वाढण्यास मदत होईल.

- अतुल पेरसपुरे, संचालक, पोल्ट्री असोसिएशन, अमरावती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com