Red Chili Rate : सोलापुरात लाल मिरचीच्या दराचा ठसका वाढला

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले.
Red Chili Rate
Red Chili RateAgrowon

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला (Red Chili Rate) चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले. वास्तविक, गेल्या महिनाभरापासून मिरचीचे दर किरकोळ चढ-उतार वगळता कायम तेजीत आहेत.

Red Chili Rate
Pune APMC : ‘डमी’ अडत्यांमुळे शेतकरी असुरक्षित

मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची आवक प्रतिदिन तीन ते पाच क्विंटल अशी जेमतेम राहिली. पण मागणीमध्ये सातत्य राहिल्याने दर मात्र चांगलेच वधारले.

Red Chili Rate
APMC Cess : मालेगावात बाजार समितीतील खरेदीदारांना सेस वसुलीसाठी नोटीस

लाल मिरचीची आवक प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध भागातूनच होतेच, पण सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा या भागातून होते. पण गेल्या महिना-दीड महिन्यापासून आवकेत सातत्याने घट होत आहे. मूळात गेल्यावर्षी मिरचीची लागवड कमी झाली.

त्याचा परिणाम आता लाल मिरचीच्या आवकेवर झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या पंधरवड्यापासून तर मागणी आणि आवकेतील तूट वाढत आहे. त्यामुळे दरात तेजी वाढत आहे. गतसप्ताहात मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १० हजार रुपये ५०० रुपये, सरासरी १२ हजार ५०० रुपये आणि सर्वाधिक १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाला.

त्याशिवाय लसूण, कांद्याचे दर मात्र काहीसे स्थिर राहिले. लसूण आणि कांद्याची आवक मात्र वाढली. लसणाची प्रतिदिन किमान १०० ते २०० क्विंटल आणि कांद्याची १०० गाड्यांपर्यंत आवक राहिली. लसणाला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये, कांद्याला किमान १०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.

टोमॅटो, बटाटा दरात सुधारणा

गेल्या आठवड्यापासून टोमॅटो आणि बटाटा दरातही काहीशी सुधारणा झाली आहे. टोमॅटोची आवक साधारण प्रतिदिन १०० ते २०० क्विंटल आणि बटाट्याची आवक ३०० ते ५०० क्विंटलपर्यंत राहिली. दोन्हींची आवक स्थानिक भागातूनच झाली.

टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक ३३०० रुपये, तर बटाट्याला किमान ७५० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २१०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत त्यांच्या दरात १०० ते २०० रुपयांच्या फरकाने सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com