Gathi Rate : कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे साखर गाठींचे दर वाढले

होळीचा सण पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठींना मागणी आहे.
Gathi Production
Gathi ProductionAgrowon

Gudhi Padwa Festival शहरटाकळी ता, नगर ः होळीचा सण (Holi Festival) पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारात साखरेच्या गाठींना मागणी (Sugar Gathi Demand) आहे.

दुसरीकडे कच्च्या मालाच्या दरात (Sugar Rate) वाढ झाल्याने या वर्षी साखर गाठ्यांच्या भावात (Gathi Rate) वाढ झाली आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे होळीच्या अगोदर पंधरा दिवसांपासून गाठींच्या उद्योगाला सुरुवात होते.

नगर जिल्ह्यात होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत गाठींना मागणी असते. पूर्वी शिवरात्रीपासून पाडव्यापर्यंत महिनाभर हा उद्योग चालायचा, अगोदर मालाचे बुकिंग केले जायचे व नंतर माल दिला जायचा.

गुढीपाडव्याला गुढीला गाठींचा हार घातला जातो, तर होळीला गावखेड्यातील लोक एकमेकांच्या घरी लहान मुलांना गाठी व कडे देतात, गुढीपाडव्यापर्यंत गाठींना मागणी असते, तर लग्न ठरलेल्या व या काळात लग्न झालेल्या नववधूला गाठी, साडी-चोळी घेण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात पाळली जाते.

Gathi Production
Sugar Rate : उन्हाळ्यात साखरेला जादा दर मिळण्याची अपेक्षा

होळीचा सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. गाठींना मागणीही भरपूर आहे. शहरटाकळी परिसराबरोबरच नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणीही गाठी पाठवल्या जात आहेत.

Gathi Production
Sakhar Gathi : गाठ्यांच्या गोडव्याला महागाईची किनार

गाठींचा किरकोळ विक्रीचा भाव १०० ते १२० रुपये किलो आहे. तर ठोक ६५ ते ७० रुपये किलो आहे. परिसरातील अनेक किरकोळ व्यापारी ठोक माल नेतात.

साखरेच्या भावात वाढ झाली नसली, तरी इंधन, साखर पावडर, दोरा, दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे.

Gathi Production
Sugar Production : साखर उत्पादन गतवर्षीपेक्षा २३ लाख टनांनी घटणार

दुसरीकडे मजुरीचा प्रश्‍न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाहीत, यामुळे हा उद्योग करण्यासाठी अडचण येते; मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही हा पारंपरिक उद्योग टिकवून ठेवला आहे, असे शंकर गादे यांनी सांगितले.

पांढऱ्या शुभ्र गाठी हे आमच्या गाठींचे वैशिष्ट्य आहे. वीस ग्रॅमपासून ५०० ग्रॅमपर्यंत एक गाठी असते. दररोज ७० ते ८० किलो माल तयार होतो. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून आमचे कुटुंब या व्यवसायात आहे.

- दतात्रय खांदे, शहरटाकळी, ता. शेवगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com