Cotton Rate : कापसाच्या वायद्यांवर सरसकट बंदी नाही

देशात कापसाची टंचाई निर्माण होऊन दर वाढलेले आहेत. कापसाचे वायदेही मागील काही महिन्यांपासून तेजीत आहेत. त्यामुळे कापड उद्योगाने वायद्यांना विरोध सुरु केला. कापड उद्योगाने सुरुवातीपासून कापसाचे वायदे बंद करण्याची मागणी लावून धरली आहे.
cotton rate
cotton rate agrowon

पुणेः कापड उद्योगाने (Textile Industry) कापूस वायद्यांमध्ये (Cotton Future) सट्टेबाजी आणि दरात (Cotton Rate) अवास्तव चढ-उतार होत असल्याचा आरोप करत वायद्यांवर बंदीची मागणी (Demand For Cotton Future Ban) केली होती. त्यामुळे मल्टि कमोडिटी एक्सचेंजने (Multi Commodity Exchange) म्हणजे एमएसीएक्सने कापूस वायद्यांच्या अटी आणि शर्ती बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वायदे तात्पुरते बंद असतील. पण कापसाच्या वायद्यांवर बंदी घातल्याची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु कापसाच्या वायद्यांवर सरसकट बंदी घातलेली नसून वायदे तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. ही वस्तुस्थिती माहित नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे.

cotton rate
Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

देशात कापसाची टंचाई निर्माण होऊन दर वाढलेले आहेत. कापसाचे वायदेही मागील काही महिन्यांपासून तेजीत आहेत. त्यामुळे कापड उद्योगाने वायद्यांना विरोध सुरु केला. कापड उद्योगाने सुरुवातीपासून कापसाचे वायदे बंद करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सिक्यूरिटिज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने वायद्यांच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचं जाहीर केलंय. त्यासाठी किमान ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील एक महिना कापसाचे जानेवारी २०२३ आणि त्यापुढचे सर्व वायदे एक महिन्यापर्यंत खुले होणार नाहीत, असा निर्णय सेबीने घेतलाय. पण सध्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे वायदे सुरु आहेत.

cotton rate
Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा

कापूस वायद्याच्या सध्या ज्या अटी आणि शर्ती आहेत, त्यातून चालू वायद्यांमध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत, असे एमसीएक्सने म्हटलंय. त्यामुळे सध्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे वायदे सुरु राहतील. जानेवारी २०२३ आणि त्यापासून पुढील वायद्यांच्या अटी-शर्ती बदलण्यात येणार आहेत. हे करताना कापड उद्योगासह बाजारातील सर्व घटकांना विश्वासात घेतले जाईल, असेही एमसीएक्सने निवेदनात म्हटलंय. कापसाच्या वायद्यांमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी देखरेख यंत्रणाही मजबूत केली जाईल, असं एमसीएक्सने जाहीर केलंय.

एमसीएक्सवर विशिष्ट घटकाचीच पकड असल्याचा आरोप कापड उद्योगाने केला होता. त्यामुळे एमसीएक्स काॅटन प्रोडक्ट अॅडव्हायजरी कमिटी अर्थात कापूस उत्पादन सल्लागार समितीचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यात कापड उद्योगासह कापूस मूल्य साखळीतील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यात येईल, असंही एमसीएक्सने स्पष्ट केलंय.

कापड उद्योगाच्या मागणीनंतर सेबी कापूस वायद्यांच्या अटी आणि शर्ती बदलणार आहे. मात्र यावर कापड उद्योग समाधानी नाही. उद्योगाच्या मते, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे वायदे सुरुच राहणार आहेत. त्यामुळे कापूस दरातील चढ-उतार सुरु राहतील. परिणामी कापड उद्योगाला दिलासा मिळणार नाही. त्यामुळे वायद्यांवर सरसकट बंदीच घालावी, अशी मागणी कापड उद्योगाने पुन्हा केली आहे. मात्र आता शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येत आहे. पुढील महिन्यापासून कापसाची आवक वाढेल. या काळात शेतकऱ्यांना वायद्यांतील दराची माहिती फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे कापूस वायद्यांवर कोणत्याही परिस्थितीत बंदी घालू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

एमसीएक्स कापूस वायद्यांच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करणार आहे. त्यासाठी एक महिना लागेल. त्यामुळे जानेवारी २०२३ चे वायदे तात्पुरते थांबवले आहेत. पण आधी सुरु असलेले वायदे सुरुच राहणार आहे. त्यात व्यवहारही होत आहेत.
सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com